Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : किल्ल्यांप्रमाणे गढ्यांच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा – छत्रपती संभाजीराजे यांचे आवाहन

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 19:05

Pune News हडपसर, ता. 3 : किल्ल्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील गढ्या या आपल्या वैभवशाली इतिहासाच्या जिवंत साक्षीदार असून, त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, मात्र त्यासोबत समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे, असे ठाम प्रतिपादन छत्रपती संभाजीराजे यांनी केले. Pune News

हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात लेखक प्रवीण हरपळे लिखित ‘गढी’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच महाराष्ट्रातील दुर्लक्षित गढ्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. Pune News

संभाजीराजे म्हणाले की, “आपल्या इतिहासाच्या खुणा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. गढ्या हे केवळ दगडी बांधकाम नसून आपल्या संस्कृतीचा जिवंत ठेवा आहे. हे वैभव जपण्यासाठी शासन, सामाजिक संस्था आणि गिर्यारोहण संघटनांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” यावेळी त्यांनी व्यासपीठावरील शासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. Pune News

आमदार चेतन तुपे यांनी गढी या पुस्तकाचे कौतुक करत गढ्यांच्या संवर्धनाचा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी किल्ले, गढ्या व वाडे यांच्या संरचनेतील साम्य-भेद स्पष्ट करत ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज अधोरेखित केली. तसेच राजस्थान व गुजरातमधील संरक्षित किल्ल्यांची तुलना करत महाराष्ट्रातील स्थितीबाबत खंत व्यक्त केली. Pune News

 

इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, आमदार राहुल कुल यांनीही आपले विचार मांडले. लेखक प्रवीण हरपळे व प्रकाशक दामोदर मगदूम नाईक यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला. या कार्यक्रमास साहित्यिक अमर जाधवराव, अरुण बोर्‍हाडे, नगरसेवक मारुतीआबा तुपे, निवृत्तीअण्णा बांदल, महेश हरपळे, राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक नानासाहेब झांबरे, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे, एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घुले यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीहरी तापकीर यांनी केले.

“आमच्या परिसरातील युवा लेखक प्रविण हरपळे यांनी अतिशय वेगळा विषय घेऊन त्याबाबतची सविस्तर माहिती नागरिकांपुढे मांडली आहे. गढ्यांचे महत्त्व किती आहे, हे त्यांच्या पुस्तकातून तसेच त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून सहज लक्षात येते.”
— मारूतीआबा तुपे, नगरसेवक

“किल्ल्यांप्रमाणेच गढ्यांनाही ऐतिहासीक महत्त्व आहे. आजही ग्रामीण भागात अशा गढ्या पाहायला मिळतात, त्यांचे जतन करणे गरजेचे आहे. शहरालगत असलेल्या गढ्यांच्या संवर्धनाबाबत महापालिकेत मुद्दा मांडणार आहे.”
— निवृत्तीअण्णा बांदल, नगरसेवक

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

बीडमध्ये मराठा बांधवांचा उद्रेक! सोलापूर-धुळे महामार्गावर टायर जाळून वाहतूक ठप्प; आंदोलकांचा सरकारवर गंभीर आरोप

Tuesday, 1 September 2026, 23:03

पूजा गई मृत्यू प्रकरण पेटले! कोळपे हॉस्पिटल विरोधात पतीचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

Tuesday, 1 September 2026, 22:00

पुण्यात गणेशोत्सवापूर्वीच मोठा प्रशासकीय दणका! १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई

Tuesday, 1 September 2026, 21:36

‘मला तुझा मित्रच समज’ म्हणत डॉक्टरची भलतीच उपचार पद्धत; आईला बाहेर बसवलं, तरुणीला एकटीला आत बोलावून नको तिथे…

Tuesday, 1 September 2026, 20:48

मुंढेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला! सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयाला स्थगिती? शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत काय ठरलं?

Tuesday, 1 September 2026, 20:06

MPSC चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर! राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत २५० पैकी अवघे २, ६ आणि ११ गुण मिळाल्याने खळबळ

Tuesday, 1 September 2026, 19:35
Next Post

Baramati News : आंतरजिल्हा दुचाकी चोराला बेड्या ; सोलापूर जिल्ह्यातील आरोपीसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश ; बारामती शहर पोलिसांची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp