Saturday, June 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : ना IT कंपनी, ना मोठा व्यवसाय; पुण्यातील एका शेतकऱ्याने ‘या’ पिकातून कमावले लाखांत उत्पन्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 February 2026, 14:37
Pune

photo- ppn

Pune : भोर तालुक्यातील एका शेतकऱ्याने आधुनिक शेती तंत्रज्ञान, काटेकोर नियोजन आणि कुटुंबाच्या मेहनतीच्या जोरावर अवघ्या एक एकर क्षेत्रातून तब्बल ३० टन वांग्याचे उत्पादन घेत सुमारे १० लाख रुपयांचा नफा कमावल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. चार महिन्यांत मिळालेल्या या उत्पन्नामुळे शेती ही योग्य पद्धतीने केल्यास फायदेशीर ठरू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

तीन वर्षांचा अनुभव, यंदाचा हंगाम ठरला ‘सुपरहिट’

भोर तालुक्यातील शेतकरी राजेंद्र महादेव सोनवणे हे गेल्या तीन वर्षांपासून काळ्या भरिती वांग्याची लागवड करत आहेत. मात्र यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी सर्वाधिक लाभदायक ठरला. ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांत त्यांनी १६ वेळा वांग्याची तोड घेतली असून आतापर्यंत सुमारे ३० टन उत्पादनाची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे झाडांवर अजूनही भरघोस फळधारणा सुरू असून मार्चपर्यंत तोड चालू राहण्याची शक्यता आहे.

 

दर्जेदार बियाण्यांची निवड ठरली निर्णायक

उत्पादन वाढीमागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे योग्य आणि दर्जेदार बियाण्यांची निवड. सोनवणे यांनी इंझा कंपनीच्या ‘बारटोक’ या काळ्या भरिती वांग्याच्या जातीची निवड केली. एक हजार बियाण्यांची एक मुडी साडेचार हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. एकूण तीन हजार बियाणांसाठी सुमारे १५ हजार रुपयांचा खर्च झाला. नर्सरीमध्ये रोपे तयार करताना प्रति रोप साधारण १ रुपया २० पैसे खर्च आला.

शास्त्रोक्त लागवड, मलचिंगचा फायदा

लागवडीपूर्वी जमिनीची योग्य तयारी करण्यात आली. निंबोळी पेंड, वसाडोस आणि कोंबडी खताच्या सुमारे ५० बॅग्स वापरून बेड तयार करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात मलचिंग पेपर टाकून पाच बाय तीन फूट अंतरावर रोपांची लागवड करण्यात आली. मलचिंगमुळे तण नियंत्रण, ओलावा टिकवणे आणि उत्पादन वाढ याचा थेट फायदा झाला. लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांत पहिली तोड सुरू झाली.

पीक संरक्षणासाठी काटेकोर नियोजन

पीक निरोगी ठेवण्यासाठी औषध फवारणीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरले. इकोला अ‍ॅग्रो कंपनीचे अर्जुन शिंदे यांनी फवारणीबाबत मार्गदर्शन केले, तर बियाणे कंपनीच्या तज्ज्ञांनी वेळोवेळी शेताला भेट देऊन पिकाची पाहणी केली. आतापर्यंत औषध फवारणीसाठी सुमारे १ लाख ९० हजार रुपयांचा खर्च झाला असला, तरी त्यातून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली.

कुटुंबाचा आधार, मजुरांची मदत

शेतीची दैनंदिन देखभाल राजेंद्र सोनवणे हे पत्नी पूनम, आई-वडिलांच्या मदतीने करतात. पाणी व्यवस्थापन, खतांचे नियोजन आणि पिकाचे निरीक्षण हे सर्व कामे कुटुंब एकत्रितपणे करत असल्याने खर्चही नियंत्रणात राहतो. मात्र वांग्याची तोड मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या काळात मजुरांची मदत घ्यावी लागते.

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

“शास्त्रोक्त पद्धतीने शेती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाची साथ यामुळेच हे यश मिळाले,” असे राजेंद्र सोनवणे सांगतात. कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि चांगला नफा कसा मिळवता येतो, याचे हे उदाहरण भोर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारल्यास शेतीही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यवसाय ठरू शकते, हा संदेश या यशोगाथेतून स्पष्टपणे पुढे येतो.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भिगवणमध्ये फायनान्स कंपनीला साडेपाच लाखांचा चुना; हफ्ते गोळा केले मात्र संस्थेत भरलेच नाहीत, 66 महिला बचत गटांची वसुली घेऊन एजंट पसार..

Saturday, 6 June 2026, 16:23

Bhigwan News: कुंभारगाव येथे भरदिवसा घरफोडी; सोन्याच्या दागिन्यांसह सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल लंपास

Saturday, 6 June 2026, 16:13

नीट घोटाळ्याचा आरोपी मोटेगावकर कोठडीत, तरीही आरसीसी क्लासेस सुरू; लातूरमध्ये संतापाची लाट

Saturday, 6 June 2026, 15:56

निदा खानची कबुली अन् पाकिस्तान कनेक्शन! टीसीएस धर्मांतर प्रकरणाला धक्कादायक वळण

Saturday, 6 June 2026, 15:33

शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत क्षणात गेली वाया, वादळी पावसामुळे केळीच्या बागेचे नुकसान; कृषी अधिकारी ‘नॉट रिचेबल’

Saturday, 6 June 2026, 14:36

मांजरीने कचऱ्यातून बाहेर काढले अर्भक, रस्त्यावरच फाडून खाल्ले; बारामतीतील भीषण प्रकार

Saturday, 6 June 2026, 14:24
Next Post

प्रशासनाला उशिरा सुचलं शहाणपण! अजितदादांच्या निधनानंतर उत्सवाचा घाट घालणाऱ्या पुणे महापालिकेची 'चूकभूल'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.