Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुमचं पार्सल आलंय…’ एक फोन आला अन् क्षणात बँक खातं रिकामं; पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा फंडा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 13 October 2026, 11:47

पुणे: ऑनलाइन खरेदी करणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून सायबर चोरटे फसवणुकीचे नवनवीन मार्ग शोधत आहेत. पार्सल पोहोचवण्याच्या बहाण्याने मोबाईलवर संपर्क साधून नागरिकांना बनावट ॲप डाउनलोड करायला लावले जात आहे. पुण्यातील एका 62 वर्षीय महिला डॉक्टरला अशाच प्रकारे 74 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

ही घटना बिबवेवाडीतील संत एकनाथनगर परिसरात राहणाऱ्या महिला डॉक्टरसोबत घडली. 6 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण ऑनलाइन वस्तू घरपोच पोहोचवणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. पार्सलच्या कारणाने विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांच्या पतीच्या मोबाईलवर एपीके फाइल पाठवली.

ही फाइल डाउनलोड करून त्यातील ॲप सुरू करण्यास सांगण्यात आले. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून डॉक्टरांनी ॲप डाउनलोड केले. त्यानंतर त्यामध्ये बँक खात्याशी संबंधित माहिती भरली. याच संधीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारला.

काही वेळातच खात्यातून 74 हजार रुपये काढण्यात आल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक सूरज बेंद्रे करीत आहेत.

 

दरम्यान, अशा प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पार्सलच्या नावाखाली अनोळखी व्यक्तीने लिंक पाठवली किंवा एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले, तर ती उघडण्यापूर्वी खात्री करा. अनोळखी ॲपमध्ये बँक खात्याची माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी भरू नका. संशयास्पद व्यवहार झाल्यास तातडीने बँकेशी आणि सायबर पोलिसांशी संपर्क साधा.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

इंदापुरात महाभोंडल्याची धूम! पारंपरिक संस्कृती अन् आधुनिक गाण्यांचा अनोखा संगम

Tuesday, 13 October 2026, 13:18

‘किती मस्ती करतो रे’ असे म्हणत 3 वर्षांच्या मुलाला स्वच्छतागृहात डांबलं; पुण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:12

मैत्रीवर विश्वास ठेवला, 17 लाखांची कार दिली… आता कारही मिळेना अन् मित्राचाही पत्ता नाही; इंदापुरातील प्रकार

Tuesday, 13 October 2026, 12:55

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम मतदार यादी मात्र 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार

Tuesday, 13 October 2026, 12:21

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमालाच नगरसेवकांची दांडी; 100 जणांना कारणे दाखवा नोटीस

Tuesday, 13 October 2026, 12:14

‘तुमचं पार्सल आलंय…’ एक फोन आला अन् क्षणात बँक खातं रिकामं; पुण्यात सायबर चोरट्यांचा नवा फंडा

Tuesday, 13 October 2026, 11:47
Next Post

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमालाच नगरसेवकांची दांडी; 100 जणांना कारणे दाखवा नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp