Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘किती मस्ती करतो रे’ असे म्हणत 3 वर्षांच्या मुलाला स्वच्छतागृहात डांबलं; पुण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 13 October 2026, 13:12

पुणे : शाळेत मस्ती केल्याच्या कारणावरून 3 वर्षांच्या चिमुकल्याला स्वच्छतागृहात बंद केल्याचा गंभीर आरोप पुण्यातील घोरपडी परिसरातील युरो किड्स शाळेतील शिक्षिकेवर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर मुंढवा पोलिसांनी संबंधित शिक्षिका आणि शाळेच्या व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणावरूनही पालकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

ही घटना 8 सप्टेंबर रोजी बी. टी. कवडे रस्त्यावरील शाळेत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. सकाळी 11:15 ते दुपारी 2:15 या कालावधीत हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. संबंधित चिमुकला शाळेत नर्सरीमध्ये शिकत असून, त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आई शाळेत पोहोचली होती.

त्यावेळी मुलाला मस्ती केल्यामुळे एका खोलीत बंद केल्याचे शिक्षिकेने आईला सांगितल्याचा दावा आहे. मात्र, आईने मुलाशी बोलल्यानंतर त्याला खोलीत नव्हे, तर स्वच्छतागृहात डांबून ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे या घटनेची खातरजमा करण्यासाठी आईने शाळा व्यवस्थापनाकडे सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली.
पालकांच्या आरोपानुसार, व्यवस्थापनाने सुरुवातीला चित्रीकरण दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 21 सप्टेंबर रोजी त्यांना फुटेज दाखवण्यात आले. या चित्रणात शिक्षिका मुलाला काही वेळासाठी स्वच्छतागृहात बंद करताना दिसत असल्याचे आईने तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजबाबत आणखी एक मुद्दा समोर आला आहे. संबंधित चित्रण दुसऱ्याच दिवशी ओव्हरराइट झाल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितल्याचा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे या घटनेबाबत अधिक तपास करण्याची मागणी होत आहे.

 

मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मुंढवा पोलिसांनी शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि सीसीटीव्ही फुटेजसंबंधीचे मुद्दे पुढील तपासातून स्पष्ट होतील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मला दारू प्यायची पैसे द्या! नकार ऐकताच वडिलांच्या छातीत लाथ मारली, आईवरही चाकूने हल्ला; पिंपरीतील धक्कादायक घटना

Tuesday, 13 October 2026, 14:09

चारा-पाण्याविना बांधलेली जनावरे अन् बाजूलाच 250 किलो मांस; इंदापुर पोलिसांची अचानक एन्ट्री, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 13 October 2026, 13:44

आयुष्यभराची पुंजी लावून फ्लॅट घेणार असाल तर थांबा; आता ‘या’ कागदपत्रांशिवाय घराची रजिस्ट्री होणारच नाही; सरकारचा नवा नियम लागू

Tuesday, 13 October 2026, 13:32

Loni Kalbhor News: घटस्फोटानंतर पत्नीच्या फेसबुक खात्याचा गैरवापर; थेऊर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:23

इंदापुरात महाभोंडल्याची धूम! पारंपरिक संस्कृती अन् आधुनिक गाण्यांचा अनोखा संगम

Tuesday, 13 October 2026, 13:18

‘किती मस्ती करतो रे’ असे म्हणत 3 वर्षांच्या मुलाला स्वच्छतागृहात डांबलं; पुण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:12
Next Post

इंदापुरात महाभोंडल्याची धूम! पारंपरिक संस्कृती अन् आधुनिक गाण्यांचा अनोखा संगम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp