Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारा-पाण्याविना बांधलेली जनावरे अन् बाजूलाच 250 किलो मांस; इंदापुर पोलिसांची अचानक एन्ट्री, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 October 2026, 13:44

आदित्य बोराटे 

इंदापूर: इंदापूर शहरातील कुरेशी गल्ली येथे पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ६ जर्शी गायी, ३ जर्शी बैल, एक रेडा, २ जर्शी खोंड आणि अंदाजे २५० किलो मांसाचा समावेश आहे. घटनास्थळी जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता धोकादायक परिस्थितीत बांधून ठेवल्याचे, तसेच मोकळ्या जागेत कापलेल्या जनावरांचे मांस व कातडी आढळल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. या प्रकरणी शब्बीर बाबुलाल कुरेशी व इतरांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्रीच्या कारवाईने परिसरात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते पहाटे २.१५ या वेळेत मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदापूर पोलिसांचे पथक पंचांसह कुरेशी गल्ली येथे पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष पत्र्याच्या शेडसह परिसरातील मोकळ्या जागेची पाहणी केली.

 

या पाहणीत काही गायी, बैल, रेडा आणि वासरे यांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता त्यांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा परिस्थितीत बांधून ठेवल्याचे आढळले. तसेच परिसरात जमिनीवर कापलेल्या जनावरांचे मांस आणि कातडी पडलेली असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी ही जनावरे ताब्यात घेतली असून, त्यांच्या चारा-पाण्याची व्यवस्था होण्यासाठी गोशाळेत ठेवण्याची तजवीज केली आहे.

मांसाचे नमुने तपासणीसाठी सीलबंद

घटनास्थळी आढळलेल्या मांसाचे नमुने पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणीसाठी घेतले असून, ते सीलबंद करून ठेवण्यात आले आहेत. जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेला पत्र देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत ९० हजार रुपये किमतीच्या सहा जर्शी गायी, ६० हजार रुपये किमतीचे तीन जर्शी बैल, १५ हजार रुपये किमतीचा एक काळ्या रंगाचा रेडा, १० हजार रुपये किमतीचे दोन जर्शी खोंड आणि २५ हजार रुपये किमतीचे अंदाजे २५० किलो मांस, असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई विठ्ठल भारत गिरी यांनी फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ मधील नमूद कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मला दारू प्यायची पैसे द्या! नकार ऐकताच वडिलांच्या छातीत लाथ मारली, आईवरही चाकूने हल्ला; पिंपरीतील धक्कादायक घटना

Tuesday, 13 October 2026, 14:09

चारा-पाण्याविना बांधलेली जनावरे अन् बाजूलाच 250 किलो मांस; इंदापुर पोलिसांची अचानक एन्ट्री, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Tuesday, 13 October 2026, 13:44

आयुष्यभराची पुंजी लावून फ्लॅट घेणार असाल तर थांबा; आता ‘या’ कागदपत्रांशिवाय घराची रजिस्ट्री होणारच नाही; सरकारचा नवा नियम लागू

Tuesday, 13 October 2026, 13:32

Loni Kalbhor News: घटस्फोटानंतर पत्नीच्या फेसबुक खात्याचा गैरवापर; थेऊर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:23

इंदापुरात महाभोंडल्याची धूम! पारंपरिक संस्कृती अन् आधुनिक गाण्यांचा अनोखा संगम

Tuesday, 13 October 2026, 13:18

‘किती मस्ती करतो रे’ असे म्हणत 3 वर्षांच्या मुलाला स्वच्छतागृहात डांबलं; पुण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:12
Next Post

मला दारू प्यायची पैसे द्या! नकार ऐकताच वडिलांच्या छातीत लाथ मारली, आईवरही चाकूने हल्ला; पिंपरीतील धक्कादायक घटना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp