Tuesday, October 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आयुष्यभराची पुंजी लावून फ्लॅट घेणार असाल तर थांबा; आता ‘या’ कागदपत्रांशिवाय घराची रजिस्ट्री होणारच नाही; सरकारचा नवा नियम लागू

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 13 October 2026, 13:32

पुणे, ता. 13 : आयुष्यभराची पुंजी खर्च करून घर खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अनधिकृत बांधकामे तसेच मंजूर नकाशापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या सदनिकांच्या दस्तनोंदणीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांशिवाय सदनिकांच्या विक्री व हस्तांतरणाच्या दस्तांची नोंदणी करता येणार नाही. त्यामुळे नियमबाह्य बांधकामे करून फ्लॅट विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २२ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व संबंधित दुय्यम निबंधकांना याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

राज्यातील काही भागांत सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी न घेता बांधकाम प्रकल्प उभारणे, त्यातील सदनिकांची विक्री करणे तसेच मंजूर बांधकाम नकाशापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या सदनिका विकण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा व्यवहारांमुळे सदनिकाधारकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने दस्तनोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य केली आहे.

कोणत्या कागदपत्रांशिवाय नोंदणी होणार नाही?
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महा-रेरा) नोंदणी करणे आवश्यक असलेल्या प्रकल्पांमध्ये सदनिकांच्या प्रथम विक्रीचा करार, खरेदीखत, डीड ऑफ अपार्टमेंट किंवा हस्तांतरणपत्र नोंदवताना संबंधित प्राधिकरणाचे नोंदणी प्रमाणपत्र किंवा भोगवटा प्रमाणपत्र आणि सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद असलेला मंजूर बांधकाम नकाशा सादर करावा लागणार आहे.

 

महा-रेरा नोंदणी आवश्यक नसलेल्या प्रकल्पांसाठी सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी किंवा प्रारंभ प्रमाणपत्र, सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद असलेला मंजूर बांधकाम नकाशा, झोन दाखला आणि मोजणी नकाशा ही कागदपत्रे आवश्यक असतील. संबंधित कागदपत्रे उपलब्ध नसल्यास अशा सदनिकांच्या दस्तांची नोंदणी करता येणार नाही.

मंजूर क्षेत्रफळापेक्षा मोठा फ्लॅट विकल्यास अडचण
बांधकाम नकाशात मंजूर असलेल्या क्षेत्रफळापेक्षा प्रत्यक्ष विक्रीच्या दस्तामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ अधिक दाखवले असल्यास, अशा दस्ताची नोंदणीही केली जाणार नाही. त्यामुळे मंजूर आराखड्यापेक्षा अधिक बांधकाम करून त्याची विक्री करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

नियम मोडणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई
या परिपत्रकातील सूचनांचे पालन न करता अनधिकृत बांधकामाशी संबंधित दस्ताची जाणीवपूर्वक नोंदणी केल्यास संबंधित दुय्यम निबंधकाविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे दस्तनोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

एकूणच, घर खरेदीदारांना आवश्यक कागदपत्रांची खातरजमा करता यावी, अनधिकृत बांधकामांमधील सदनिकांच्या व्यवहारांमुळे होणारी फसवणूक रोखता यावी आणि मालमत्ता व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढावी, या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, यावरच सर्वसामान्य घर खरेदीदारांना मिळणाऱ्या संरक्षणाचे यश अवलंबून राहणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आयुष्यभराची पुंजी लावून फ्लॅट घेणार असाल तर थांबा; आता ‘या’ कागदपत्रांशिवाय घराची रजिस्ट्री होणारच नाही; सरकारचा नवा नियम लागू

Tuesday, 13 October 2026, 13:32

Loni Kalbhor News: घटस्फोटानंतर पत्नीच्या फेसबुक खात्याचा गैरवापर; थेऊर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:23

इंदापुरात महाभोंडल्याची धूम! पारंपरिक संस्कृती अन् आधुनिक गाण्यांचा अनोखा संगम

Tuesday, 13 October 2026, 13:18

‘किती मस्ती करतो रे’ असे म्हणत 3 वर्षांच्या मुलाला स्वच्छतागृहात डांबलं; पुण्यात शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल

Tuesday, 13 October 2026, 13:12

मैत्रीवर विश्वास ठेवला, 17 लाखांची कार दिली… आता कारही मिळेना अन् मित्राचाही पत्ता नाही; इंदापुरातील प्रकार

Tuesday, 13 October 2026, 12:55

प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम मतदार यादी मात्र 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार

Tuesday, 13 October 2026, 12:21
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp