Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कवडीपाट टोलनाक्यावर तरुणीचा विनयभंग; दोन सख्ख्या भावांविरोधात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 9 September 2026, 18:15

लोणी काळभोर, ता. 9 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या 23 वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिच्या दुचाकीला कट मारत अश्लील हातवारे व शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात 4 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन सख्ख्या भावांविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नटराज उर्फ नट्या शिवाजी कदम (वय 24) आणि बाब्या शिवाजी कदम (वय 22दोघेही रा. टोलनाका, कदमवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील 23 वर्षीय तरुणीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी नोकरदार असून, कामानिमित्त भावासोबत हडपसर येथे गेल्या होत्या. काम आटोपून त्या भावासोबत दुचाकीवरून लोणी काळभोर येथील घराकडे परतत होत्या. त्यांची दुचाकी कवडीपाट टोलनाक्याजवळ आली असता आरोपी नटराज उर्फ नट्या आणि बाब्या कदम यांनी दुचाकीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर आरोपींनी तरुणीच्या दुचाकीला कट मारून अडथळा निर्माण केला. तसेच अश्लील हातवारे आणि शिवीगाळ करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार नटराज कदम आणि बाब्या कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74 75 (i) (ii) 79 351 (2)281 व 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगताप करीत आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंविरोधात थेट ईडीची एन्ट्री! हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आणि वाळू तस्करीचा गंभीर आरोप

Thursday, 10 September 2026, 21:14

तुकाराम मुंढेंचा दणका! गणेशोत्सवात महाप्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांसाठी FDA ची कठोर नियमावली लागू

Thursday, 10 September 2026, 20:27

दिवाळी-छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या पुणेकरांची उडाली झोप; रेल्वेगाड्यांमध्ये ‘रिग्रेट’चा मेसेज

Thursday, 10 September 2026, 19:50

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत MPSC बद्दल मोठा निर्णय! MPSC मुख्य परीक्षा २०२५ चे रिचेकिंग होणार; मुलाखतींनाही तात्काळ स्थगिती

Thursday, 10 September 2026, 19:07

दिशा सालियन प्रकरणात मोठी अपडेट! केसचा तपास आता नव्या अधिकाऱ्याच्या हाती; CBI ने घेतला मोठा निर्णय

Thursday, 10 September 2026, 18:40

हडपसर-माळवाडीत आठ घरे आगीच्या भक्ष्यस्थानी; सिलिंडरच्या स्फोटाने थरार

Thursday, 10 September 2026, 18:25
Next Post

कोल्हापूर 'गोकुळ' निवडणुकीचा बिगुल वाजला; ५,३३१ मतदार बजावणार अधिकार, १८ ऑक्टोबरला मतदान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp