Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 28 July 2026, 12:14

हडपसर, ता. २८ : मांजरी परिसरात विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणात पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तरुणाच्या हातावर लिहिलेला संदेश आणि घटनास्थळी मिळालेली सुसाईड नोट यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करीत आहेत.

याबाबत मयत प्रविण दत्ता माने (वय २८) यांची आई ललिता दत्ता माने यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रणाली प्रविण माने आणि सुमीत जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण माने यांचा विवाह २० मे २०२५ रोजी प्रणाली जगन्नाथ जाधव हिच्याशी झाला होता. विवाहानंतर दोघे मांजरी येथील ओमसाई पार्क फेज-५ मधील राहत्या घरी कुटुंबासोबत राहत होते.

२० जुलै २०२६ रोजी प्रणाली माने या कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्यानंतर मांजरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. नंतर त्या स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्या. त्यांनी पोलिसांसमोर सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याचे सांगितले आणि आई-वडिलांसोबत माहेरी निघून गेल्या. त्यानंतर प्रविण माने यांनी पत्नीचे लग्नापूर्वीपासून सुमीत जाधव याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. तसेच लग्नानंतरही ते संबंध सुरू असल्याचा संशय व्यक्त केला. यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

२३ जुलै २०२६ रोजी सकाळी ललिता माने या कामावर गेल्या असताना घरात इतर नातेवाईक होते. सकाळी सुमारे ११ वाजता त्या घरी परतल्या असता प्रविण यांनी बेडरूमचा दरवाजा उघडत नसल्याचे लक्षात आले. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता प्रविण यांनी साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

दरम्यान, मृताच्या हातावर “बायकोने आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला” असा मजकूर लिहिलेला होता. तसेच घटनास्थळी सुसाईड नोटही आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीयांनी औपचारिक तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून मांजरी पोलिसांनी प्रणाली प्रविण माने आणि सुमीत जाधव यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोप हे फिर्यादीच्या तक्रारीवर आधारित असून, त्याची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून सर्व बाजूंचा तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऑगस्टपासून महागाईचा विस्फोट! ‘या’ 4 क्षेत्रांतील वस्तूंचे दर गगनाला भिडणार,सर्वसामान्यांचे हाल होणार..

Tuesday, 28 July 2026, 12:47

कागदी नोटांना टाटा? आता येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन

Tuesday, 28 July 2026, 12:31

‘बायको आणि तिच्या प्रियकराने जीव घेतला’ असे हातावर लिहून तरुणाने केली आत्महत्या; पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 12:14

गाडीत चालक झोपला अन् चोरट्यांनी साधला डाव! मांजरीत आयशर टेम्पोतून 15 लाखांचा माल केला लंपास

Tuesday, 28 July 2026, 12:00

इन्स्टाग्राम भारतात बंद होणार? व्हायरल मेसेजवर केंद्र सरकारने केला खुलासा; जाणून घ्या सत्य

Tuesday, 28 July 2026, 11:30

पाण्याच्या मोटरीवरून वाद, अन् शेतकऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला; शिरूरमधील धक्कादायक घटना

Tuesday, 28 July 2026, 11:14
Next Post

कागदी नोटांना टाटा? आता येणार प्लास्टिकच्या नोटा; RBI चा मोठा प्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.