Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे गणेशोत्सवात यंदा काय बदलणार? ‘प्लाझ्मा-लेसर’ला मंडळांचा नकार; डीजे आणि स्पीकरबाबत मोठी घोषणा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 25 August 2026, 8:31

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध गणेश मंडळांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीत डीजे, ढोल-ताशा, विसर्जन मिरवणुका, परवाने आणि उत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली.

यंदाच्या गणेशोत्सवात प्लाझ्मा आणि लेसरचा वापर न करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी एकमताने घेतला. मात्र, डीजे आणि ध्वनिव्यवस्थेवरील निर्बंधांबाबत कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर नाराजी व्यक्त केली. नियम स्पष्ट आणि कायमस्वरूपी असावेत, दरवर्षी त्याच विषयावर चर्चा होऊ नये, अशी मागणी काही मंडळांनी केली.

बैठकीच्या सुरुवातीलाच एका पर्यावरणप्रेमीने डीजे आणि ढोल-ताशांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली. यामुळे वातावरण तापले. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. परिस्थिती वाढू नये म्हणून महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला बाहेर नेले.

काही कार्यकर्त्यांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांवरही प्रश्न उपस्थित केले. कार्यकर्त्यांवरील कारवाई, डेसिबल मीटरची वैधता आणि मागील काही वर्षांत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. गणेश मंडळांवर अनावश्यक निर्बंध लादू नयेत, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

 

मुंबईतील मूर्ती कोसळण्याच्या घटनेचा संदर्भ देत पुण्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत आणि धोकादायक तारा हटवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी गणेश मंडळांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. सीसीटीव्ही, महिलांसाठी स्वतंत्र रांग आणि स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या. परवान्यांसाठी लवकरच ‘एक खिडकी’ योजना सुरू केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेवटच्या 5 दिवसांसाठी स्पीकरच्या वेळेबाबत शिथिलता देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महापौर मंजुषा नागपुरे यांनीही मंडळांसाठी एक खिडकी योजनेची घोषणा केली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात मंडळांच्या तक्रारी सोडवण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार आहेत.

याशिवाय यंदा पुण्यात गणेशोत्सवाचे डिजिटल मॅपिंग केले जाणार आहे. कोणते मंडळ कुठे आहे, कोणता देखावा साकारला आहे आणि त्या ठिकाणी कसे पोहोचायचे, याची माहिती नागरिकांना डिजिटल पद्धतीने मिळणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पृथ्वीराज कपूर हायस्कूल तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्रथम! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड

Wednesday, 30 September 2026, 19:34

सासरच्या त्रासाला कंटाळून पिंपळगाव येथे विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 30 September 2026, 19:28

यवतमध्ये भरदिवसा महिलांची चैन स्नॅचिंग; बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिक आक्रमक; सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Wednesday, 30 September 2026, 19:10

पुणेकरांची प्रतीक्षा संपली! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो अवघ्या १० दिवसांत प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार

Wednesday, 30 September 2026, 18:57

स्पर्धा परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! MPSCच्या सर्व परीक्षा आता ऑफलाईन; रिक्त पदंही भरणार

Wednesday, 30 September 2026, 18:49

दारू शौकिनांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ‘या’ दिवशी दारूविक्री बंद,,राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

Wednesday, 30 September 2026, 18:15
Next Post

“तर मी राजकारण सोडेन”; संजय राऊतांचं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp