Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

देवदर्शनासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले! फुरसुंगीतील मुक्ताई रेसिडेन्सीमध्ये दुहेरी घरफोडी, सोन्या-चांदीचे दागिने केले लंपास

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 18 November 2026, 12:53

फुरसुंगी, (पुणे) : देवदर्शनासाठी कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या शिक्षक महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लंपास केला. फुरसुंगी येथील पॉवर हाऊस परिसरातील मुक्ताई रेसिडेन्सीमध्ये ही घरफोडी झाली. याच इमारतीतील आणखी एका बंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दोन्ही घरांतून एकूण 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

वंदना गजानन तापकीर (वय-58, रा. खोली क्रमांक 4, मुक्ताई रेसिडेन्सी, पॉवर हाऊस, फुरसुंगी) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना तापकीर या फुरसुंगी येथील लिटील चॅम्प्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करीत असून पतीसह राहतात. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास तापकीर दाम्पत्य नातेवाईकांसह खासगी वाहनाने देवदर्शनासाठी बाहेर पडले होते. मांढरदेवी, पाली, खंडोबा, येल्लम्मादेवी सौंदत्ती, हम्पी, बदामी, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर असा त्यांचा प्रवास सुरू होता.

15 नोव्हेंबर रोजी सकाळी गाणगापूर येथे असताना शेजारी राहणाऱ्या सरस्वती केदारी यांनी फोन करून तापकीर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची माहिती दिली. त्याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या सुनीता संजय सावंत यांच्या घरातही चोरी झाल्याचे त्यांना समजले. देवदर्शनाचा प्रवास सुरू असल्याने त्यांना तातडीने पुण्यात परतता आले नाही. 16 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास त्या घरी परतल्या.

घरी आल्यानंतर हॉलमधील लोखंडी कपाट फोडलेले, लॉकर उघडलेले आणि कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तपासणी केली असता चार सोन्याच्या अंगठ्या, एक सोन्याची चैन, चांदीचा कंबरपट्टा, चांदीचे पैजण, जोडवे आणि 15 हजार रुपये रोख असा 2 लाख 2 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरी झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, याच इमारतीतील सुनीता सावंत यांच्या घरातून अन्नपूर्णा देवीची चांदीची मूर्ती, दोन चांदीचे करंडे, चार तांब्याचे तांबे, एक पितळेचा तांब्या, एक तांब्याची कढई आणि आर्मी पुरस्कारांचे चांदीचा मुलामा असलेले दोन कप चोरीला गेले. या वस्तूंची किंमत 11 हजार रुपये असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एकूण 2 लाख 13 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. फुरसुंगी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

फुरसुंगीत जुन्या भांडणातून 17 वर्षीय करण नागटिळकची निर्घृण हत्या ; काळेपडळ येथील चौघांविरोधात फुरसुंगी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

Wednesday, 18 November 2026, 13:04

देवदर्शनासाठी गेले अन् चोरट्यांनी घर साफ केले! फुरसुंगीतील मुक्ताई रेसिडेन्सीमध्ये दुहेरी घरफोडी, सोन्या-चांदीचे दागिने केले लंपास

Wednesday, 18 November 2026, 12:53

थेऊर फाटा येथील तृतीयपंथीयांच्या संमेलनासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब; कारागिराला सव्वा 2 लाखांचा फटका!

Wednesday, 18 November 2026, 12:35

पुणे महापालिकेतील नर्सनेच सहकारी परिचारिकांना लुटले! 53 लाखांचा घोटाळा, पैशांतून मुलीचे लग्न अन् फ्लॅटही केला खरेदी

Wednesday, 18 November 2026, 12:26

महाराष्ट्रात आणखी एक सरकारी योजना गुंडाळली ! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; लाभार्थ्यांना बसणार धक्का?

Wednesday, 18 November 2026, 12:22

पुण्यात शंकर महाराज मठात प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता? FDA ने केली कारवाई

Wednesday, 18 November 2026, 12:10
Next Post

फुरसुंगीत जुन्या भांडणातून 17 वर्षीय करण नागटिळकची निर्घृण हत्या ; काळेपडळ येथील चौघांविरोधात फुरसुंगी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp