Wednesday, November 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाटा येथील तृतीयपंथीयांच्या संमेलनासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब; कारागिराला सव्वा 2 लाखांचा फटका!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 18 November 2026, 12:35

लोणी काळभोर : तृतीयपंथीय समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनात दागिन्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने हैदराबादहून लोणी काळभोरमध्ये आलेल्या एका सुवर्णकाराला तब्बल 2 लाख 38 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. प्रवासादरम्यान लक्झरी बसमध्ये ठेवलेल्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने असलेले दोन प्लास्टिकचे डबे अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मनोज हरीनारायण सोनी (वय 50 , रा. हैदराबाद) असे फिर्यादी सुवर्णकाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांना हैदराबाद येथील परिचित व्यक्तीने थेऊर फाटा येथील वृंदावन पॅलेस येथे आयोजित तृतीयपंथीय समाजाच्या राष्ट्रीय संमेलनात दागिन्यांची विक्री करण्याची संधी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी नाकातील नोज पिन, कानातील दागिने तसेच विविध प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने तयार करून सोबत घेतले होते.

सोनी हे लक्झरी बसने हैदराबादहून लोणी काळभोरकडे 15 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास निघाले. प्रवासादरम्यान बस दोन ठिकाणी चहा-नाश्त्यासाठी थांबली. त्यावेळी सोनी बसमधून खाली उतरले होते. मात्र, त्यांची बॅग बसमधील सीटवरच होती. 16 नोव्हेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास ते थेऊर फाटा येथे उतरले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये खोली घेऊन फ्रेश होताना बॅगेतील दागिन्यांचे दोन प्लास्टिकचे डबे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 1 लाख 98 हजार रुपये किमतीचे 15 ग्रॅम सोन्याचे दागिने, तर 40 हजार रुपये किमतीचे सुमारे 150 ते 200 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने होते. यामध्ये नोज पिन, कानातील वेल, लटकन, नेकलेस, ब्रेसलेट, चैन, बाजूबंद आणि कानातील टॉप्स यांचा समावेश आहे. याप्रकरणी मनोज सोनी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

थेऊर फाटा येथील तृतीयपंथीयांच्या संमेलनासाठी आणलेले सोन्या-चांदीचे दागिने गायब; कारागिराला सव्वा 2 लाखांचा फटका!

Wednesday, 18 November 2026, 12:35

पुणे महापालिकेतील नर्सनेच सहकारी परिचारिकांना लुटले! 53 लाखांचा घोटाळा, पैशांतून मुलीचे लग्न अन् फ्लॅटही केला खरेदी

Wednesday, 18 November 2026, 12:26

महाराष्ट्रात आणखी एक सरकारी योजना गुंडाळली ! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; लाभार्थ्यांना बसणार धक्का?

Wednesday, 18 November 2026, 12:22

पुण्यात शंकर महाराज मठात प्रसाद बनवण्याच्या ठिकाणी अस्वच्छता? FDA ने केली कारवाई

Wednesday, 18 November 2026, 12:10

‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; इंदापुरात १०० हून अधिक कर्मचारी सहभागी

Wednesday, 18 November 2026, 11:46

गोकुळचा २८० कोटींचा हिशेब कुठे बिघडला? पशुखाद्य विभागालाही १६ कोटींचा तोटा; प्रशासकीय मंडळाची श्वेतपत्रिका

Wednesday, 18 November 2026, 11:41
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp