Wednesday, June 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर तालुक्यात जलसंकट! भाटघर धरण १० टक्क्यांवर तर निरा-देवघरमध्ये २४ टक्केच साठा; धरणांनी गाठला तळ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 21 May 2026, 20:18

इम्रान आत्तार 

 भोर: सध्या मे  महिना संपण्याच्या मार्गावर असून अजूनही कडक उन्हाळा , मोठे तापमान , प्रचंड उकाडा वाढला असून भोर तालुक्यातील धरणांनी  भाटघर, निरा – देवघर धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने धरणांनी तळ गाठला आहे. भाटघर धरणात १०.५३ टक्के तर निरा- देवघर धरणात २४.१२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच शेतकरी वर्गाला ,नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा लागूनराहिली आहे. धरणाच्या पाण्यांनी तळ गाठल्याने भोर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी पुरवठा कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

 

धरणांतून गेल्या तीन महिन्यांपासून होत असल्याने सततच्या पाणी विसर्गामुळे धरणातील पाणी पातळी खालावली असून धरणाचे बुडीत क्षेत्र कोरडे पडू लागले आहे. २४ टीएमसी एवढी भाटघर धरणाची पाणी पातळी असुनही शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे ‌
भोर शहराला भाटघर धरणातून वर्षभर पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरण क्षेत्रातील पाणी पातळी घटून १० टक्के म्हणजे अत्यल्प पाणीसाठा उरला असल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भोर शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाणी वापर करावा, असे आवाहन नगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

भाटघर धरणाची पाणी साठवण क्षमता २४ टिएमसी असून भोर, खंडाळा, पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण यासह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील शेतीला आणि गावांना या धरणातून पाणीपुरवठा होतो. तर १२ टीएमसी असलेल्या निरा-देवघर धरणाचे पाणी भोर, खंडाळा, फलटण तालुक्यातील शेतीला व पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगी ठरते.

यंदा पाऊस वेळेवर दाखल न झाल्यास धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणांच्या पाणी पातळीत घट झाल्याने धरण क्षेत्रातील काही विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या उर्वरित पाणीसाठ्यातून पाणीटंचाईचे संकट टाळण्यासाठी पुढील काळात योग्य नियोजन करून धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हांडेवाडीत राँग साईडने आलेल्या रिक्षामुळे दुचाकीस्वार जखमी; अपघातानंतर चालक फरार

Wednesday, 10 June 2026, 12:47

पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची अखेर अफवाच

Wednesday, 10 June 2026, 12:41

Sadhana Bank : सहकार क्षेत्रात ‘साधना बँके’ला देशातील सर्वोत्तम सहकारी बँकेचा बहुमान तर अध्यक्षा वंदना काळभोर यांना ‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान..

Wednesday, 10 June 2026, 12:36

Big Breaking: पुणे महानगरपालिका बॉम्बने उडवून देण्याची धमकी? ई-मेलमुळे खळबळ; पोलिसांकडून इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू

Wednesday, 10 June 2026, 11:56

इराण-अमेरिका युद्धाचा बाजाराला फटका; सोन्या-चांदीच्या दरात घसरण

Wednesday, 10 June 2026, 11:48

चिनी ॲप वापरून चालवले जात होते गर्भलिंग निदानाचे रॅकेट; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Wednesday, 10 June 2026, 11:23
Next Post

पुणे रेल्वे स्थानकाजवळ DRI चा मोठा छापा! वन्यजीव तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड; वन विभागाकडे तपास सुपूर्द

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.