Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sadhana Bank : सहकार क्षेत्रात ‘साधना बँके’ला देशातील सर्वोत्तम सहकारी बँकेचा बहुमान तर अध्यक्षा वंदना काळभोर यांना ‘बेस्ट चेअरपर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 10 June 2026, 12:36

लोणी काळभोर, (पुणे) : सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट आणि गतिमान कामगिरी, सातत्यपूर्ण ग्राहकाभिमुख सेवा, पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्तीच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असणाऱ्या ‘साधना सहकारी बँक लि., पुणे’ ने थेट राष्ट्रीय पातळीवर आपल्या यशाचा झेंडा फडकावला आहे. साधना बँकेला राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘Best Urban Co-Op Bank Award 2026’ (सर्वोत्तम नागरी सहकारी बँक पुरस्कार) प्राप्त झाला आहे.

या योगासोबतच, बँकेच्या मार्गदर्शिका आणि अध्यक्षा वंदना काळभोर यांच्या कुशल आणि दूरदृष्टी नेतृत्वाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय पातळीवरील ‘Best Chairperson Of The Year Award 2026’ (वर्षातील सर्वोत्तम अध्यक्ष’ पुरस्कार) या सर्वोच्च मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या दुहेरी बहुमानामुळे संपूर्ण पुणे जिल्हा आणि सहकार क्षेत्रातून साधना बँकेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शनिवारी (ता. 06) सायंकाळी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील प्रसिद्ध ‘हॉटेल रामदा’ येथे हा भव्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला. पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे (महाराष्ट्र), भारत नेटवर्क ग्रुप आणि नाफ्कब (NAFCUB) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावरील ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट, प्रशिक्षण व पुरस्कार परिषद 2026’ चे आयोजन करण्यात आले होते. या देशपातळीवरील दिमाखदार कार्यक्रमात साधना बँकेला आणि अध्यक्षा वंदना काळभोर यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

यावेळी साधना बँकेचे संचालक सुरेश घुले, चंद्रकांत कवडे, रमेश घुले, अनिल तुपे, प्रवीण तुपे, दिनकर हरपळे, सुभाष काळभोर, जानकू कदम, रोहिणी तुपे, बाळासाहेब तुपे, योगेश भगत आणि भाऊ तुपे उपस्थित होते. सर्व संचालकांनी या राष्ट्रीय यशाबद्दल आनंद व्यक्त केला.

देशभरातील बँकांच्या मूल्यांकनात ‘साधना बँक’ अव्वल..

हा पुरस्कार देताना देशभरातील शेकडो सहकारी बँकांच्या प्रगतीचा, आर्थिक शिस्तीचा, डिजिटल उपक्रमांचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा विविध कडक निकषांवर आढावा घेण्यात आला. या संपूर्ण मूल्यांकनात साधना सहकारी बँकेने सर्वोत्तम कामगिरी नोंदवून राष्ट्रीय पटलावर अव्वल स्थान पटकावले. बँकेची प्रगतीशील वाटचाल आणि पारदर्शकता ही देशातील इतर बँकांसाठी आदर्श ठरली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर बँकेच्या अध्यक्षा वंदना काळभोर म्हणाल्या की, “हा सन्मान माझा किंवा एकट्या बँकेचा नसून, संपूर्ण साधना परिवाराच्या एकजुटीचा, समर्पणाचा आणि अथक परिश्रमांचा गौरव आहे. बँकेचे संचालक मंडळ, सभासद, लाखो ग्राहक, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांच्या अखंड सहकार्यामुळेच आज आपण या राष्ट्रीय शिखरावर पोहोचू शकलो आहोत.”

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

अमेरिका-इराण तणाव कमी होताच कच्चे तेल झाले स्वस्त, आता पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

Monday, 27 July 2026, 9:01

आता ‘तारीख पे तारीख’ नाही! हिंजवडी मेट्रोच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम; ‘या’ तारखेपासून धावणार मेट्रो

Monday, 27 July 2026, 8:51

पेपरफुटी करणाऱ्यांची आता खैर नाही! 10 वर्षांचा तुरुंग, 10 कोटींचा दंड; केंद्र सरकारने आणला कठोर कायदा

Monday, 27 July 2026, 8:38

आधी प्रेम, मग लग्नाचं आश्वासन… शेवटी 1.11 कोटी घेऊन महिला फरार; पुण्यातील घटना

Monday, 27 July 2026, 8:25

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा दमदार कमबॅक! पुणे, मुंबई, कोकणसह ‘या’ भागांत जोरदार सरी; हवामान विभागाचा अलर्ट

Monday, 27 July 2026, 8:11

Daily Horoscope: महादेवांच्या कृपेने आज बदलणार ‘या’ राशींचे नशीब; करिअर आणि धनलाभाचे जबरदस्त योग

Monday, 27 July 2026, 7:28
Next Post

पुणे महानगरपालिकेचे मुख्य कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची अखेर अफवाच

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.