Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी बुद्रुकमधील २४३ एकर बहुमूल्य जमिनीला अखेर संरक्षण मिळणार; अमोल नाना तुपे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 31 August 2026, 14:30

पुणे : मांजरी बुद्रुक येथील सर्व्हे क्रमांक १८०, १८१, १८२, १८३ आणि १८४ मधील सुमारे २४३ एकर मौल्यवान शासकीय जमिनीला आता संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी या जमिनीवरील अतिक्रमणाचा धोका तसेच कॅनललगतच्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

सदर जमीन ‘सुभाष सामुदायिक सहकारी शेतकरी संस्था’ आणि ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ यांना भाडेपट्टा कराराने देण्यात आली आहे. कॅनललगत असलेल्या या जमिनीवर अतिक्रमण होण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी तुपे यांनी केली होती.

यासंदर्भात अमोल नाना तुपे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन देण्यासह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडेही सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर सिंचन विभागाचे अधिकारी किरण कुदळे यांच्या उपस्थितीत कॅनललगतच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान कॅनलच्या कडेने मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती असून लहान मुलेही या परिसरात वावरत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. संरक्षण भिंत नसल्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असून यापूर्वी कॅनलमध्ये पडून दुर्घटना घडल्याचेही तुपे यांनी सांगितले.

 

त्यामुळे कॅनललगत मजबूत संरक्षण भिंत उभारण्यासोबतच २४३ एकर जमिनीभोवतीही संरक्षण व्यवस्था उभारावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच जमिनीचे आणि कॅनलच्या हद्दीचे अचूक सर्वेक्षण व सीमांकन करून भविष्यातील अतिक्रमण आणि वाद टाळावेत, अशी भूमिका क्रांती शेतकरी संघटनेने मांडली.

या मागण्यांना प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्याने मांजरी बुद्रुक परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अजितदादा पवार यांच्याकडे केलेले निवेदन आणि सरकारी अधिकाऱ्यांकडे केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे अमोल नाना तुपे यांनी सांगितले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

साखरेच्या किंमतीत वाढ अन् टंचाई! ऐन सणासुदीत केंद्र सरकारचा साखर अन् इथेनॉलबाबत महत्वाचा निर्णय…

Sunday, 18 October 2026, 15:13

पुण्यात निष्काळजीपणाचा बळी! ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षा यंत्रणांचा अभाव उघड!

Sunday, 18 October 2026, 15:05

“पण तुम्ही IAS होऊ नका’ असं का बोलून गेले तुकाराम मुंढे; तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, नेमकं काय म्हणाले?

Sunday, 18 October 2026, 15:03

अन् जन्मदात्याने स्वतःच्याच मुलीच्या शरीराचे लचके तोडले; गरोदर राहताच…पुण्यातल्या त्या प्रकरणात कोर्टाने घडवली जन्माची अद्दल…

Sunday, 18 October 2026, 14:49

पुण्यात चक्क बुरखा घालून ज्वेलर्सच्या दुकानात घुसले पुरुष! कोयते-बंदुका काढून थरार अन् शेजारचा दुकानदार ओरडताच….

Sunday, 18 October 2026, 14:42

पुण्यात सख्ख्या भावाचं बहिणीसोबत निर्दयी कृत्य! किरकोळ वाद टोकाला जाताच डोकं सटकलं अन् असं काही केलं की…

Sunday, 18 October 2026, 14:32
Next Post

शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी मोदींचा फोटो दिसला अन् अमित ठाकरे संतापले; “काढ रे तो फोटो!” म्हणत थेट खाली उतरवला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp