Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राग अनावर झाला अन् दोघांनी एकमेकांचा जीव घेतला! पुण्यातील लेबर कॅम्पमधील थरारक घटना

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 30 July 2026, 13:27

पुणे: खेड तालुक्यातील शिंदेगाव येथे एका लेबर कॅम्पमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने चाकण औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारी सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास दोन मजुरांमध्ये झालेल्या साध्या वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाले. या झटापटीत दोघांनी एकमेकांवर चाकू आणि दगडी पाट्याने हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही मजुरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिंदेगाव येथील निप्पॉन सांसो कंपनीसमोरील लेबर कॅम्पमध्ये हि घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी दोघांमध्ये कोणत्यातरी किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला सुरू झालेला शाब्दिक वाद काही वेळातच गंभीर स्वरूपाचा झाला. रागाच्या भरात दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि दोघांनी जवळ असलेल्या वस्तूंचा वापर करून एकमेकांवर हल्ला केला. एका मजुराने चाकूने तर दुसऱ्याने दगडी पाट्याने वार केल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले.

घटनेनंतर कॅम्पमधील इतर कामगारांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. चिरंजीत बसूमातो याच्यावर चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते, तर अमरुष उराव याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गंभीर दुखापत आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. चिरंजीत बसूमातो (वय 37) आणि अमरुष उराव (वय 44) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही कामगारांची नावे आहेत. दोघेही मूळचे पश्चिम बंगालमधील रहिवासी होते.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49

हडपसर येथील वॉव स्टे लॉजमधील खोलीत वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची आत्महत्या; आरोपी वकिलाला अटक

Friday, 25 September 2026, 22:45

पुण्याच्या मानकरी बाप्पांना निरोप! ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन संपन्न

Friday, 25 September 2026, 22:10

अन् तिने पैशांसाठी स्वतःच्या लेकराला विकलं! लिव्ह-इन रिलेशनशिपमधून गरोदर राहिली अन् दारुड्या बॉयफ्रेंडला कंटाळून बाळाचा सौदा

Friday, 25 September 2026, 21:37

शिरूर पूर्वभागात डीजेच्या दणदणाटाला फाटा! टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप; पोलिसांकडून कौतुक

Friday, 25 September 2026, 21:16

गणेशोत्सवात शिक्रापूर पोलिसांचा दुहेरी फोकस! सायबर फ्रॉडसह महिला सुरक्षेबाबत जनजागृती; २७ गणेश मंडळांना भेट

Friday, 25 September 2026, 21:01
Next Post

'अमित शाहांनी राजीनामा द्यावाच!' अभिजीत दीपकेंचा थेट हल्लाबोल; सरकारवर गंभीर आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp