Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘अमित शाहांनी राजीनामा द्यावाच!’ अभिजीत दीपकेंचा थेट हल्लाबोल; सरकारवर गंभीर आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 30 July 2026, 14:00

पुणे: कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या घटनांबाबत केंद्र सरकार, पोलिस आणि भाजपवर विविध आरोप केले. तसेच विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

केंद्रीय शिक्षणमंत्रीपदावर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते अत्याचाराचं समर्थन करतात. या बदलामुळेही सरकारच्या कार्यपद्धतीत कोणताही सकारात्मक फरक पडलेला दिसत नाही. सत्ताधारी पक्षाकडे सक्षम पर्यायांची कमतरता असल्याची टीका करत, “त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला.

कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याचे आरोप होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले की, जर असे खरोखर घडत असेल तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या गृहमंत्र्यांचे ते अपयश ठरते. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले.

 

भाजपकडून अनेकदा पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याचा दावा करत, कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काहीजणांकडून दबाव आणि धमक्या येत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण व्यवस्थेवर आणि सरकारच्या धोरणांवरही टीका केली. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर होत असून, या विषयांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यांनी तरुणांना ट्रोल करण्याऐवजी त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. हीच तरुण पिढी भविष्यात देशाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करत त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचे दीपके म्हणाले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

शेतकरी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असून, गरज पडेल तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या भूमिकेवर टीका करताना दीपके यांनी आंदोलनावेळी सर्वत्र कॅमेरे होते, त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच आंदोलनापूर्वी काही गोष्टींची पूर्वतयारी झाल्याचा दावा करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जून कोरडा गेला अन् जुलैने अक्षरशः झोडपले! पुण्यात पडला तब्बल ५०८ मिमी पाऊस; मोडीत निघाले सर्व जुने विक्रम

Thursday, 30 July 2026, 23:01

‘आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक” ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली” शरीरसंबंध ठेवत त्याने…

Thursday, 30 July 2026, 22:24

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43
Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोर्टाच समन्स ! 6 ऑगस्टला कल्याण न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.