अक्षय टेमगिरे

शिरूर : उरळगाव येथील शेतातील दोन बोअरमधून पाण्याच्या मोटारी व तांब्याच्या केबलची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उरळगाव येथील शेतकरी रामदास लहानु काळे वय ७१ यांच्या शेतातील बोअरमधील लक्ष्मी कंपनीची ५ एचपीची मोटार व २५० फूट तांब्याची तार असलेली केबल तसेच त्यांचे बंधू बाळासाहेब काळे यांच्या शेतातील बोअरमधील लक्ष्मी कंपनीची ३ एचपीची मोटार व २५० फूट तांब्याची तार असलेली केबल असा एकूण १७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.

ही चोरी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजल्यानंतर ते १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजण्यापूर्वी उरळगाव हद्दीतील शेतात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शेतातील बोअरमधील मोटारी व केबल चोरीस गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर रामदास काळे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहवा पवार हे करीत आहेत .







