Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यवतमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; एका प्रकरणात लोणी काळभोरच्या तरुणावर फूस लावून पळवून नेल्याचा संशय

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 1 June 2026, 17:08

यवत, ता. १ : दौंड तालुक्यातील टेळेवाडी आणि कासुर्डी परिसरातून दोन अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. एका प्रकरणात विशिष्ट तरुणावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेळेवाडी येथे उसतोडणीसाठी वास्तव्यास असलेली करिष्मा (वय १७, बदललेले नाव) ही अल्पवयीन मुलगी २९ मेच्या मध्यरात्री ते ३० मेच्या पहाटे दरम्यान बेपत्ता झाली. करिष्मा ही आपल्या बहिणीसोबत खोलीत झोपली होती. मात्र रात्री ती अचानक गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी परिसरात तिचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही ती आढळून न आल्याने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी करिष्माच्या बहिणीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत कासुर्डी येथील करीना (वय १५ वर्षे, बदललेले नाव) ही रविवारी (दि. ३१) दुपारी बेपत्ता झाली. करीना ही बकऱ्यांच्या वाड्यावर थांबली होती. तिची आई बकऱ्या चारण्यासाठी गेल्यानंतर परत आल्यावर मुलगी तेथे आढळून आली नाही. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी तसेच परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नाही.

 

करीनाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, नातेवाईकांनी लोणी काळभोर येथील एका तरुणावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणीही भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दौंड तालुक्यात अवघ्या दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यवत पोलीस दोन्ही मुलींचा शोध घेत असून संबंधित संशयितांचा माग काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

NEET नंतर आता ‘या’ प्रश्नावर रणशिंग; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट इशारा, ‘खड्डामंत्री’वर निशाणा

Sunday, 26 July 2026, 12:55

सोनं पुन्हा महागलं! आठवड्यात मोठी उसळी;24 कॅरेटचा भाव ₹1,44,930 प्रति तोळा,जाणून घ्या आजचे दर

Sunday, 26 July 2026, 11:39

मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार; रॅलीपूर्वी संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष, भाजपलाही टोला!

Sunday, 26 July 2026, 11:00

IT कंपनीत नोकरीचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवरील एका मेसेजनं पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Sunday, 26 July 2026, 10:27

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49
Next Post
'Dhananjay Munde fired two rounds at me', sensational allegation by Sarpanch Santosh Deshmukh's brother; 'High voltage' drama in Beed

"धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड फायर केले" सरपंच संतोष देशमुखांच्या भावाचा खळबळजनक आरोप; बीडमध्ये 'हाय व्होल्टेज' ड्रामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.