Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोलवडी-साष्टे येथे रस्ता मोजणीच्या वादातून व्यावसायिकासह दोघांना मारहाण; तर फॉर्च्युनरवर दगड-रॉडने हल्ला, हल्ला; लोणीकंद पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 2 July 2026, 16:30

थेऊर, (पुणे) : साष्टे-वाडेगाव शिवरस्त्याचे शासकीय मोजणी आणि रस्ता करण्याचे काम सुरू असताना जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाला आणि त्यांच्या मित्राला चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत व्यावसायिकाच्या फॉर्च्युनर गाडीवर मोठा दगड मारून आणि लोखंडी रॉडने वार करून गाडीचे नुकसान केल्याप्रकरणीलोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश साळुंके, अथर्व साळुंके, हनुमंत साळुंके, साहील जगताप (सर्व रा. साष्टे/परिसर, ता. हवेली) व इतर महिला आणि पुरुष अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याबाबत रोहीत शिवाजी मोडक (वय 35, धंदा जमीन खरेदी विक्री व्यवसाय, रा. ए/23, इंद्रा हाईटस, कामधेनु इस्टेट शेजारी, हडपसर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित मोडक यांनी साष्टे (ता. हवेली) येथील गट नं. 54, मध्ये शेतजमीन घेतलेली आहे. दिनांक 30 जून 2026 रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास साष्टे-वाडेगाव शिवरस्ता येथे शासकीय मोजणी करून रस्ता करण्याचे काम सुरू होते. यावेळी कोलवडी येथील तलाठी भाऊसाहेब स्वामी यांनी मोडक यांना फोन करून सांगितले की, “तुमच्या जागेत असलेला तुमच्या नावाचा बोर्ड शिवरस्त्याच्या मोजणीत येत असून, तो काढून मागे घ्या.”

 

तलाठ्यांच्या फोननंतर रोहित मोडक हे त्यांचे मित्र अजय अशोक जगदाळे यांच्यासह त्यांच्या फॉर्च्युनर गाडीने साष्टे येथे गेले. घटनास्थळी पोहोचल्यावर मोडक यांनी मित्र अजय जगदाळे याला रस्त्याच्या कडेला थांबवले आणि ते तलाठी भाऊसाहेब यांना पाहण्यासाठी वाडेगावच्या दिशेने गाडी घेऊन गेले. परंतु पुढे देखील भाऊसाहेब न दिसल्याने त्या ठिकाणी असलेल्या योगेश साळुंके, अथर्व साळुंके, हनुमंत साळुंके आणि साहील जगताप यांनी अजय जगदाळे यांनी घेराव घातला व अंगावर धावून जात हाताने मारहाण व शिवीगाळ करू लागले.

रोहित मोडक हे मित्राला वाचवण्यासाठी गाडी घेऊन जवळ पोहोचले असता, आरोपी हनुमंत साळुंके याने फॉर्च्युनरच्या समोरील काचेवर मोठा दगड मारला. तसेच योगेश साळुंके याने डाव्या बाजूच्या दरवाजाच्या काचेवर दगड मारून काचा फोडल्या. मोडक यांनी गाडीतून बाहेर पडून “माझ्या गाडीचे नुकसान का करता?” असे विचारले असता, “तुम्ही आमच्या येथे कशाला आला?” असे म्हणत अथर्व साळुंके याने हातातील लोखंडी रॉडने गाडीच्या बोनेटवर समोरील बाजूने मारून गाडीचे मोठे नुकसान केले.

दरम्यान, गाडीतून खाली उतरल्यानंतर आरोपींनी मोडक आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला. अथर्व साळुंके याने रोहित मोडक यांच्या पाठीवर दगड मारून जखमी केले, तर हनुमंत साळुंके याने हातावर दगड मारल्याने मोडक यांच्या डाव्या हाताच्या कोपराला गंभीर दुखापत झाली. आरोपी अथर्वने अजय जगदाळे यांच्या छातीवरही दगड मारल्याने ते जखमी झाले. याशिवाय तेथील इतर महिला व पुरुषांनी दोघांना हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून रोहित मोडक यांनी मोबाईलवरून 112 वर फोन करून मदत मागितली. पोलिसांनी दोघांना उपचारासाठी ससून रुग्णालय, पुणे येथे पाठवले. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर बुधवारी (ता. 01) मोडक यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार मच्छिंद्र वाळके करीत आहेत.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

लोहगड खून प्रकरणात आता होणार साच का सामना! 'लाय डिटेक्टर टेस्ट' करण्याची तयारी; अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.