Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ भीषण दुर्घटना! नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गावर उलटली, 3 तरुणांचा मृत्यू

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 November 2026, 13:57

पुणे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. कारने महामार्गावरील दुभाजक ओलांडून दुसऱ्या मार्गिकेत प्रवेश केला आणि पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ही दुर्घटना वाघोली परिसरातील विठ्ठलवाडी कमानीजवळ रविवारी मध्यरात्री सुमारे 1.25 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर कार दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत उलटली. काही अंतर पुढे गेल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला कारची धडक बसली. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या दुर्घटनेत ओमकार अजय सूर्यवंशी (वय 24), शंकर वासुदेव ढोळे (वय 22) आणि मयूर सतीश औटी (वय 26) यांचा मृत्यू झाला. हे तिघेही वाघोलीतील फूलमळा रोड परिसरात राहत होते. तर आशुतोष नंदकुमार मरकड (वय 28) आणि प्रणय भरत शिंदे (वय 24) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने वाघोली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

वाघोलीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ भीषण दुर्घटना! नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गावर उलटली, 3 तरुणांचा मृत्यू

Monday, 23 November 2026, 13:57

तळेगाव ढमढेरे येथे एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये राडा; तरुणाच्या डोक्याला पडले दहा टाके, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 23 November 2026, 13:51

पनवेल-बदलापूर प्रवास आता फक्त 20 मिनिटांत! 4 किमी बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात

Monday, 23 November 2026, 13:10

रेणुका कला केंद्रात नाचगाण्याच्या कार्यक्रमात पैशांवरून वाद; ठेकेदारासह दोघांना बेदम मारहाण, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 23 November 2026, 12:38
Accident

कोरेगाव मूळ येथील अल्ट्राटेक फाट्याजवळ झालेल्या अपघातात जखमी महाविद्यालयीन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Monday, 23 November 2026, 12:24

उरुळी कांचनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री दोन होंडा युनिकॉर्न गायब; सोसायटीत खळबळ

Monday, 23 November 2026, 12:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp