Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कोरेगाव मूळ येथील अल्ट्राटेक फाट्याजवळ झालेल्या अपघातात जखमी महाविद्यालयीन तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 November 2026, 12:24
Accident

Accident

उरुळी कांचन, ता. 23 : पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या 18 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील अन्य दोघे विद्यार्थीही जखमी झाले आहेत. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कोरेगाव मूळ हद्दीतील अल्ट्राटेक फाट्याजवळ घडली.

अथर्व लक्ष्मण इंगळे (वय 18, रा. उरुळी कांचन) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित संतोष डोलारे (वय 18, रा. शिवा फार्म, कोरेगाव मूळ) याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंडिका कारचालक अनिल मारोती वाघमारे (रा. वडगाव, ता. चाकूर, जि. लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित डोलारे, अथर्व इंगळे आणि आदित्य वासकर हे तिघेही 6 नोव्हेंबर रोजी रात्री शिंदवणे येथे व्हिडिओ शूटिंगसाठी बजाज बॉक्सर दुचाकीवरून निघाले होते. दुचाकी आदित्य वासकर चालवत होता, तर अथर्व मध्यभागी आणि अभिजित मागे बसला होता. पुणे-सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनच्या दिशेने जात असताना अल्ट्राटेक फाट्याच्या पुढे ए टू झेड टायर पंक्चर दुकानासमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या इंडिका कारने जोरदार धडक दिली.

या धडकेत तिघेही दुचाकीसह रस्त्यावर फेकले गेले. अभिजित आणि आदित्य यांना दुखापत झाली, तर अथर्वच्या डोक्याला गंभीर मार लागला. तिघांनाही उपचारासाठी उरुळी कांचन येथील श्री सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले. अथर्वची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील द पुना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना 17 नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.

अपघातानंतर उपचार आणि कुटुंबावरील दुःखामुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याचा आरोप कारचालकावर करण्यात आला आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Breaking News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब ठेवल्याची अफवा! वकील आणि नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

Monday, 23 November 2026, 14:52

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकीची भीषण धडक; नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू!

Monday, 23 November 2026, 14:51

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पीएमपीएमएलकडून नव्याने १२ पूरक बसमार्ग सुरू; सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मिळणार सेवा

Monday, 23 November 2026, 14:37

बोर्ड परीक्षेतही कॅल्क्युलेटर? सीबीएसई, एनसीईआरटीला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

Monday, 23 November 2026, 14:26

वाघोलीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ भीषण दुर्घटना! नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गावर उलटली, 3 तरुणांचा मृत्यू

Monday, 23 November 2026, 13:57

तळेगाव ढमढेरे येथे एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये राडा; तरुणाच्या डोक्याला पडले दहा टाके, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 23 November 2026, 13:51
Next Post

रेणुका कला केंद्रात नाचगाण्याच्या कार्यक्रमात पैशांवरून वाद; ठेकेदारासह दोघांना बेदम मारहाण, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp