Monday, November 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तळेगाव ढमढेरे येथे एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये राडा; तरुणाच्या डोक्याला पडले दहा टाके, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 23 November 2026, 13:51

शिक्रापूर, ता. 23 : घरासमोरील गुलाबाच्या फुलावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याची घटना तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे घडली. या वादातून लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत मनीष ढवळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या डोक्याला दहा टाके पडले आहेत. सध्या त्याच्यावर शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास अतुल ढवळे याचा चुलते अरुण ढवळे यांच्या घरासमोरील गुलाबाच्या रोपातील फुल घेण्यावरून अरुण यांच्या सून उषा ढवळे हिच्याशी वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी उषा पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे समजल्याने अतुल याची आई नंदा ढवळे या समजूत काढण्यासाठी नातेवाइकांच्या घरी गेल्या होत्या.

यावेळी नंदा यांच्यासोबत त्यांचे मुलगे मनीष व विकास हेही गेले होते. घरासमोर विचारपूस सुरू असताना अरुण ढवळे, त्यांची मुले किरण व अविनाश यांनी विकास याला पकडले. त्यावेळी मनीष हा भावाला सोडविण्यासाठी पुढे आला असता अरुण ढवळे यांनी हातातील लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यात वार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच किरण व अविनाश यांनी विकास याला काठी व हाताने मारहाण केली. यावेळी रंजना व उषा यांनी नंदा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या मारहाणीत मनीष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला दहा टाके पडले आहेत. नंदा यांच्या दोन्ही हातांच्या कोपरांनाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी नंदा ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुण वनसिंग ढवळे, किरण अरुण ढवळे, अविनाश अरुण ढवळे, रंजना अरुण ढवळे आणि उषा किरण ढवळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इथापे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरक्षणावर तुकाराम मुंढेंचं अत्यंत रोखठोक भाष्य! एकदा लाभ मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने… नेमकं काय म्हणाले?

Monday, 23 November 2026, 15:22

गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाचा मध्यरात्री ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार! भरधाव कारने दोघांना उडवलं; दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू

Monday, 23 November 2026, 15:13

Breaking News: पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात बॉम्ब ठेवल्याची अफवा! वकील आणि नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात

Monday, 23 November 2026, 14:52

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर शिवाई बस आणि दुचाकीची भीषण धडक; नाझरे येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू!

Monday, 23 November 2026, 14:51

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! पीएमपीएमएलकडून नव्याने १२ पूरक बसमार्ग सुरू; सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मिळणार सेवा

Monday, 23 November 2026, 14:37

बोर्ड परीक्षेतही कॅल्क्युलेटर? सीबीएसई, एनसीईआरटीला दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

Monday, 23 November 2026, 14:26
Next Post

वाघोलीतील विठ्ठलवाडी कमानीजवळ भीषण दुर्घटना! नियंत्रण सुटल्याने भरधाव कार महामार्गावर उलटली, 3 तरुणांचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp