लोणी काळभोर, ता. 16 : कडीपत्त्याच्या बंडलवरून सुरु झालेल्या भांडणाचे (Theur News) हाणामारीत रुपांतर झाले आहे. “तुम्ही जास्त किंग आहेत काय? थांबा तुम्हाला (Pune Crime) दाखवतो, असे म्हणून टोळक्याकडून चुलतभावांना दगड व लाकडी बांबुने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर फाटा (ता. हवेली) गुळाचा चहा दुकानाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत गुरुवारी (ता.15) सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मारहाणीत चुलतभाऊ जखमी झाले आहेत तर 5 ते 6 जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

हुसेन नदाफ (रा. मार्ग वस्ती, नायगांव फाटा, ता. हवेली, जि.पुणे) व त्याचे इतर 4 ते 5 साथीदार (वय अंदाजे 25 ते 30 वयोगटातील) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय अशोक चव्हाण (वय 34 , रा. जाधव वस्ती. कुंदन मिलच्या मागे, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय चव्हाण यांचे चुलते प्रकाश चव्हाण यांचा कडीपत्ता विक्रीचा व्यवसाय आहे. प्रकाश चव्हाण यांनी आंध्रप्रदेश येथील एका व्यापाऱ्याकडून 20 कडीपत्त्याचे बंडल आणले होते. त्यापैकी 5 कडीपत्त्याचे बंडल आरोपी हुसेन नदाफ यांना देण्यासाठी शेठ यांनी सांगितले होते. त्यानुसार प्रकाश चव्हाण यांनी हुसेन यास 5 कडीपत्त्याचे बंडल दिले होते.
दरम्यान, 5 कडीपत्त्याचे बंडल घेतल्यानंतर हुसेन याने प्रकाश चव्हाण यांच्याकडे आणखी 7 कडीपत्त्याचे बंडल हवे आहेत. असे सांगितले. परंतु, प्रकाश चव्हाण यांनी मोजून बंडल आणल्याने तुला देऊ शकत नाही. असे स्पष्ठ सांगितले होते. आरोपी हुसेन नदाफ याने प्रकाश चव्हाण यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की करु लागला. तेव्हा फिर्यादी अक्षय चव्हाण हे हुसेन यास समजावून सांगत होते. आरोपी हुसेन याने अक्षयचा चुलतभाऊ प्रशांत यांना शिवीगाळ केली.
आरोपी हुसेन म्हणाला की “तुम्ही जास्त किंग आहे काय? थांबा तुम्हाला दाखवतो “असे म्हणून त्याच्या इतर 4 ते 5 साथीदारांना बोलावुन घेतले. आणि फिर्यादी अक्षय चव्हाण यांचे चुलत भाऊ प्रशांत याला हाताने मारहाण करु लागले. अक्षय चव्हाण हे भांडणे सोडविण्याकरीता मध्यस्थी करू लागले. तेव्हा आरोपी हुसेन याने फिर्यादी अक्षय चव्हाण यांच्या डोक्यात दगड मारला. व त्याच्या इतर साथीदारांनी लाकडी बांबुने डोक्यात व उजव्या हातावर मारुन गंभीर जखमी केले.
याप्रकरणी अक्षय चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हुसेन नदाफ व त्याचे इतर 4 ते 5 अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 189(2), 189 (4), 191(2), 191(3), 118(2), 115(2), 352, 351(2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करत आहेत.







