Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आठवडे बाजारातील चोरींना आळा; शिक्रापूर पोलिसांनी पकडले सात चोरटे, मदत करणाऱ्या नागरिकांचाही केला सन्मान

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 8:00

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : शिक्रापूर पोलीस ठाण्याने गेल्या दीड महिन्यापासून शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि तळेगाव ढमढेरे येथील आठवडा बाजारांमध्ये वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. सातत्यपूर्ण गस्त, ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्क सहकार्याच्या जोरावर पोलिसांनी सलग सात चोरट्यांना रंगेहात पकडून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या यशस्वी कारवाईत मोलाची मदत करणाऱ्या नागरिकांचा शिक्रापूर पोलिसांकडून विशेष सत्कार करण्यात आला आहे.

आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन मोबाईल दागिने आणि रोकड चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके कार्यरत करण्यात आली होती. बाजार परिसरात नियमित गस्त घालत ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही सातत्याने करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत शिक्रापूर आठवडा बाजारात सारिका राजू जाधव व साक्षी मेघराज पवार (रा. मांतरवाडी, हडपसर) या दोघींना चोरी करताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोरेगाव भीमा आठवडा बाजारात नागरिकांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारे जावेद अजिज सय्यद व लुकमान सुलेमान सय्यद रा. शिरूर या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

दरम्यान आज पुन्हा कोरेगाव भीमा आठवडा बाजारात गस्त सुरू असताना मालन सहदेव पवार, रेखा गणेश दगडे आणि सायली कार्तिक दगडे सर्व रा. वाघोली, ता. हवेली या तीन महिलांना चोरी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण मोहिमेत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना केलेले सहकार्य विशेष ठरले असून संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवणे वेळेवर माहिती देणे आणि कारवाईदरम्यान पोलिसांना मदत करणे यामुळे अनेक चोरट्यांना पकडणे शक्य झाले आहे.

या कर्तव्यदक्ष नागरिकांचा गौरव करण्यात आला असून सुरेश भांडवलकर, दिनेश भोरे, साईनाथ शिनगारे सर्व रा. कोरेगाव भीमा, तसेच सिकंदर शेख, रियाज शेख रा. शिक्रापूर आणि इतर नागरिकांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात आमंत्रित करून शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक, गोपनीय अंमलदार संदीप कारंडे, तसेच श्रावण गुपचे, सुरेंद्र सरोदे आणि अजिंक्य कुदळे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यावेळी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की पोलीस आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम केल्यास कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते भविष्यातही नागरिकांनी अशाच प्रकारे सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे. शिक्रापूर पोलिसांच्या या उपक्रमामुळे आठवडा बाजारातील चोरट्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून व्यापारी आणि नागरिकांकडून या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाची हजेरी! 'या' भागांत हलक्या सरींचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp