Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले; सहकार क्षेत्रात राजकीय शक्तिप्रदर्शन रंगण्याची शक्यता

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 19 October 2026, 12:43

उरुळी कांचन, ता. 19 : मतदार यादीवरील हरकतींमुळे मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या हवेली तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीचे अखेर रणशिंग फुंकले गेले आहे. सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, येत्या 21 नोव्हेंबर 2026 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज, 19 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. कोट्यवधींच्या ठेवी आणि मालमत्ता असलेल्या या संस्थेवरील वर्चस्वासाठी तालुक्यातील दोन राजकीय गट आमनेसामने येण्याची चिन्हे असून, आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वीच हवेलीतील सहकार क्षेत्रात राजकीय शक्तिप्रदर्शन रंगण्याची शक्यता आहे.

हवेली तालुक्यात पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्यापाठोपाठ खरेदी-विक्री संघाला महत्त्वाचे स्थान आहे. पुणे मार्केट यार्डमध्येही या संस्थेचे अस्तित्व असल्याने तिच्या आर्थिक आणि राजकीय महत्त्वाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संस्थेच्या संचालक मंडळावर आपल्या समर्थकांची वर्णी लावून तालुक्यातील राजकीय वर्चस्व कायम ठेवण्यासाठी विविध गटांकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी या संस्थेचा वापर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यशवंत सहकारी साखर कारखाना आणि पुणे बाजार समितीतील राजकीय समीकरणे मजबूत करण्यासाठी झाल्याचे मानले जाते. मात्र, तालुक्यात बदलत असलेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. मतदार यादीच्या वादाने न्यायालयापर्यंत घेतलेली धाव आणि त्यानंतर जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम यामुळे राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.

पुणे बाजार समिती आणि यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासकीय राजवट संपल्यानंतर हवेलीतील सहकार क्षेत्रात पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पदांवर आपल्या समर्थकांना संधी मिळावी, यासाठी गटांची जुळवाजुळव सुरू होण्याची शक्यता आहे. ‘कालचा शत्रू आजचा मित्र’ अशी बदलती राजकीय समीकरणेही या निवडणुकीत पाहायला मिळू शकतात.

 

19 जागांसाठी 303 मतदार बजावणार हक्क
हवेली तालुका सहकार निबंधक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीतील माहितीनुसार, तालुका कृषी पणन संस्थांचे 93 मतदार, तर प्रतिनिधी सभासदांचे 210 मतदार आहेत. अशा एकूण 303 मतदारांच्या माध्यमातून संघाच्या 19 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे मर्यादित मतदारसंख्या असली, तरी या निवडणुकीतील प्रत्येक मताला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक राजकीय ताकद आजमावण्याची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे. कोणते गट एकत्र येतात, कोण उमेदवार रिंगणात उतरवतात आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक
19 ते 26 ऑक्टोबर 2026 : उमेदवारी अर्ज दाखल करणे
27 ऑक्टोबर 2026 : अर्जांची छाननी
12 नोव्हेंबर 2026 : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
21 नोव्हेंबर 2026 : मतदान

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मतदान करताना सावधान! ‘ही’ चूक पडेल महागात; जाणून घ्या योग्य पद्धत

Tuesday, 20 October 2026, 15:22

“मला 500 कोटी दिले?” जरांगेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान; दिल्लीतील भाजप नेत्यांना काय सांगितलं ?उत्तर द्या….

Tuesday, 20 October 2026, 14:59

तळीरामांनो पुण्यात २१ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ‘ड्राय डे’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Tuesday, 20 October 2026, 14:56

पुण्यात दांडिया कार्यक्रमात तुफान राडा! तरुणाला बेदम मारहाण, डोक्यात दगड घातला अन् नंतर…

Tuesday, 20 October 2026, 14:50

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! दिवाळीअगोदरच खिशात पडणार बोनस; किती रुपये मिळणार?

Tuesday, 20 October 2026, 14:45

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर! ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर टोळीप्रमुखासह १० सराईत तडीपार

Tuesday, 20 October 2026, 14:36
Next Post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नायगावमध्ये शस्त्रपूजन कार्यक्रम; फावडे, कुदळ अन् संविधानाचे केले पूजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp