Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डिकसळ येथील १६७ वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल मोजतोय अखेरची घटका; ऊसाच्या अवजड वाहतुकीमुळे पुलाची लागली वाट…?

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 13:51

सागर जगदाळे

भिगवण : सोलापूर आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडणारा डिकसळ (ता. इंदापूर) येथील १६७ वर्षाचा ब्रिटिशकालीन पूल अखेरची घटका मोजत असून आता पुलाचे एक एक दगड ढासळू लागले आहेत. जिंती, कोंढार चिंचोली, खातगाव, कात्रज, टाकळी व परिसरातील ऊस मालकांच्या आडमुटेपणामुळे या पुलावरून अवजड ऊसाची वाहतूक केल्यामुळे पुलाची वाट लागली आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.

डिकसळ येथील पुलावरून अवजड वाहनांवर वाहतुकीसाठी शासनाने घातलेली बंदी ही गेल्या १६ वर्षांपासून कागदावरच राहिली आहे. याला फक्त सरकारच जबाबदार आहे असे नाही तर या पुलावरून जर वाहतूक बंद व्हावी. यासाठी प्रशासनाने दोन्ही बाजूंना मोठमोठे लोखंडी बॅरॅकेट्स टाकले होते. पण काही अज्ञात ऊस टोळी मालकांनी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्या बॅरिकेट ची तोडफोड करून पुलावरून उसाचे ट्रॅक्टर नेण्यास सुरुवात केली. शेवटी जे घडायचे होते ते आज घडलेच.

 

याच कर्माचे आज हे फळ आहे की, या ब्रिटिशकालीन पुलाचे मध्यभागी असणारे आधाराचे दगड ढासळले आहेत. व दैनंदिन होणारी दळणवळण व्यवस्था बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. या पुलावरून वाहने जात असताना पुलाचे निसटलेल्या दगडाखालील माती ढासळू लागली आहे. एखादे जर मोठे अवजड वाहन किंवा शाळेची बस यावरून जात असताना अनुचित प्रकार घडला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डिकसळ येथील पुलाचे बांधकाम सन १८५५ साली करण्यात आले होते. गेली ४० ते ४२ वर्षे  हा पूल पाण्याखाली आहे. पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील पुनर्वसित गावे कोंढार चिंचोली (ता.करमाळा) व डिकसळ(ता.इंदापूर) यांना जोडणारा भीमा नदीवरील हा पूल दुवा म्हणून काम करीत आहे. यावर अवजड वाहतुक बंद करण्यासाठी अडथळे टाकण्यात आले होते. पण तेही काढून अवजड वाहतूक सुरू केली. त्यामुळे आज हा पुल अखेरच्या घटका मोजत आहे.

दरम्यान, उजनी धरणाच्या पुनर्वसनानंतर रेल्वेमार्गावर रस्ते वाहतुकीसाठी मार्ग म्हणून हा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. गेल्या चार- पाच वर्षांपूर्वी कोकणातील सावित्री नदीवरील पूल कोसळल्याची घटना घडली होती, त्यावेळी प्राचीन ब्रिटिशकालीन पूल म्हणून याही पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले होते व ‘हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे’, अशा सूचना डिकसळ पुलाच्या दोन्ही बाजूला लावण्यात आल्या होत्या. पण प्रशासनाने लावलेल्या या सुचनाकडे साफ दुर्लक्ष करून त्यावरून अवजड वाहतूक केल्यामुळे पुलाला आपल्या अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

बँका सलग 'हे' चार दिवस बंद राहणार ; तर विविध मागण्यांसाठी दोन दिवस कर्मचारी संपावर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.