राहुलकुमार अवचट

यवत: सहजपूर येथे थार गाडीची दुचाकीला धडक दिली असून या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सहजपूर गावच्या हद्दीतील पांगारकर वस्ती जवळ प्रिन्स हॉटेल समोर दि. २९ जुलै रोजी रात्री ०८.३० च्या सुमारास अशोक नाईकनवरे व बालाजी कोचाळे हे एम. एच.२५ बी. एच .५३६६ या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या एम. एच. १४ के. जे. २२८८ या महिंद्रा कंपनीच्या थार गाडीने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील अशोक भास्कर नाईकनवरे (वय ३० रा. येणेगाव, ता. परांडा, जि. धाराशिव) व बालाजी भास्कर कोचाळे ( वय ४३ रा. जवळा (निजाम) ता. परांडा, जि.धाराशिव ) यांचा मृत्यू झाला असून याबाबत अश्रकांत भास्कर नाईकनवरे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून यावरून सदगुरू कैलास होले (रा. संत तुकाराम नगर भोसरी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोसई मोरे हे करत आहेत.







