Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहशत माजवणाऱ्या सुरज देडगेची एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षासाठी अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 24 August 2026, 20:23

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : औद्योगिकीकरणामुळे झपाट्याने विस्तारत असलेल्या शिक्रापूर परिसरात दहशत निर्माण करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीवर शिक्रापूर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे.

सुरज उर्फ मोन्या संजय देडगे वय २७, रा. चाकण रोड, शिक्रापूर याला धोकादायक व्यक्ती म्हणून स्थानबद्ध करण्यात आले असून पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानंतर त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने आर्थिक व्यवहार आणि नागरिकांची वर्दळ वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करून गैरमार्गाने आर्थिक फायदा मिळविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी दिले होते.

 

त्यानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हद्दीतील गुन्हेगारांचा अभिलेख तपासून वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींची माहिती संकलित केली त्यामध्ये सुरज उर्फ मोन्या देडगे याच्याविरुद्ध चंदननगर, शिरूर, नारायणगाव आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर दुखापत खून खुनाचा प्रयत्न जबरी चोरी शिवीगाळ व दमदाटीसह दुखापत अशा स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या देडगे याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच पोलीस अंमलदार महेश बनकर आणि शिक्रापूरचे रोहिदास पारखे यांनी या प्रस्तावासाठी विशेष पाठपुरावा केला. प्रस्तावाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकाऱ्यांनी देडगे याला धोकादायक व्यक्ती या प्रवर्गात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

आदेश प्राप्त होताच शिक्रापूर पोलिसांनी देडगेचा शोध सुरू केला. तब्बल दोन दिवस शोध घेतल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची अकोला मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

दहशत दादागिरी करणाऱ्यांची गय नाही

शिक्रापूर व रांजणगाव परिसरातील एमआयडीसी क्षेत्रात दहशत दादागिरी किंवा गुंडगिरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उद्योजक, कामगार, व्यावसायिक किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन दबाव निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे.

याबाबत माहिती मिळताच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल औद्योगिक क्षेत्रातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सतर्क आहेत, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि शिरूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, तसेच रोहिदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके व इतर पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नाट्यमय घडामोडी! निवडणुकीत तिरंगी सामना; जगतापांच्या बंडाने समीकरणे बदलली

Wednesday, 30 September 2026, 17:31

पुणेकरांची वाहतूक कोंडी सुटणार! बहुप्रतिक्षित HCMTR प्रकल्पाचे काम अखेर ४ टप्प्यांत मार्गी लागणार

Wednesday, 30 September 2026, 17:10

सोरतापवाडीत चारचाकी गाडी अडवून तरुणाला मारहाण ; काचा फोडून चावीही नेली, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल..

Wednesday, 30 September 2026, 16:39

१ ऑक्टोबरपासून देशात होणार मोठे बदल! एलपीजी सिलिंडर, एटीएम चार्जेस अन् जन्म-मृत्यू नोंदणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या सर्व अपडेट्स

Wednesday, 30 September 2026, 16:32

आलेगावच्या मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती ? पर्यावरणप्रेमींचा सवाल; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी आणि फेरपंचनाम्याची मागणी

Wednesday, 30 September 2026, 16:29

दिवाळीत फटाक्यांवर पुन्हा निर्बंध? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभराचं लक्ष ‘त्या’ आदेशाकडे!

Wednesday, 30 September 2026, 16:12
Next Post

'तिनं माझ्या भावाला घराबाहेर काढलं, आमच्याशी संबंध तोडले' कुणाल चांदगुडेच्या आत्याचा खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाल्या?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp