Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर अचानक गोंधळ! मालगाडी बंद पडली अन् प्रवाशांचे झाले हाल

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 24 September 2026, 9:16

पुणे: लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावर बुधवारी सायंकाळी लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावर अचानक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना गाड्यांची प्रतीक्षा करावी लागली. काही गाड्या तब्बल 2 ते 2.5 तास उशिराने धावल्याने नोकरी, व्यवसाय आणि इतर कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

लोणावळा, मळवली, कामशेत आणि तळेगाव या स्थानकांवर या विलंबाचा परिणाम अधिक जाणवला. वेळापत्रकानुसार गाडी येत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे विलंबाबाबत पुरेशी माहिती वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारीही प्रवाशांकडून करण्यात आल्या.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामागे मळवली-कामशेतदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये आलेला तांत्रिक बिघाड कारणीभूत ठरला. मालगाडी अचानक मार्गातच थांबल्यामुळे तिच्या मागून येणाऱ्या प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे सेवेला याचा थेट फटका बसला.

या व्यत्ययामुळे प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस आणि सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेससह इतर काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला. लोकल सेवांनाही या तांत्रिक अडचणीचा परिणाम सहन करावा लागला. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही विलंबाचा सामना करावा लागला.

मालगाडीच्या इंजिनातील बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथक कामाला लावले. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे संध्याकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंबई-बंगळुरूनंतर महाराष्ट्राला आणखी एक स्लीपर वंदे भारत! कोणत्या शहरांना मिळणार हायस्पीड रेल्वेची भेट?

Friday, 6 November 2026, 11:42

वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट!लता, सुशील हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना कोर्टाचा दिलासा,कडक अटी शर्थीसह जामीन…

Friday, 6 November 2026, 11:06

रुग्णालयाचा पत्ता विचारायचा बहाणा अन् विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावला एमआयटी कॉलेजजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांचा धुमाकूळ

Friday, 6 November 2026, 10:49

पुण्यात स्वाइन फ्लूचा कहर! तब्बल 879 रुग्णांची नोंद,आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली…

Friday, 6 November 2026, 10:39

पोलीस भरती घोटाळा उघड करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; ऑडिओ क्लिपने खळबळ, घोटाळ्याचे धागेदोरे कुठंपर्यत?

Friday, 6 November 2026, 10:23

दोन वर्षांसाठी पुण्यातून हद्दपार, तरीही परतला! वाघोलीत कोयते घेऊन दहशत माजवणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

Friday, 6 November 2026, 10:20
Next Post

अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; विसर्जनाचे 4 शुभ मुहूर्त कोणते? जाणून घ्या वेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp