Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाट्यावर भरधाव दुचाकीची धडक; आठवडाभर मृत्यूशी झुंज देणाऱ्या ७८ वर्षीय ज्येष्ठांचा अखेर मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 July 2026, 18:02

लोणी काळभोर, ता. १४ : पुणे–सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ससून रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लक्ष्मण नारायण होमकर (वय ७८) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर धनाजी वसंत चंदनशिवे (रा. शंकरगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी स्नेहल गणेश व्हावळ यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण होमकर हे कुंजीरवाडी परिसरात एकटे राहत होते. १ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते थेऊर फाटा येथून दूध घेऊन पायी घरी परतत असताना एस-४जी हॉटेलसमोर भरधाव वेगाने आलेल्या हिरो स्प्लेंडर प्लस (एमएच-१२-डीके-९२९१) या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील विश्वराज रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी भारती रुग्णालय आणि नंतर ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ७ जुलै रोजी पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने दुचाकीचा क्रमांक आणि चालकाची माहिती उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार धनाजी चंदनशिवे याच्याविरुद्ध बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पुणे–सोलापूर महामार्गावरील भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! रजा रोखीकरणाची मर्यादा ४५० दिवस करण्याचा प्रस्ताव

Monday, 26 October 2026, 23:00

मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत अपर पोलीस महासंचालकांचा मोठा आदेश! १ नोव्हेंबरपासून वाहनांसाठी कडक नियम लागू

Monday, 26 October 2026, 22:01

मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या ५०० कोटींच्या कथित ऑडिओ क्लीपची चौकशी होणार; मुंबई पोलिसांकडून SIT स्थापन

Monday, 26 October 2026, 21:29
Next Post

राष्ट्रवादीत बदलांचे वारे! जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांची एंट्री, एका दिग्गज मंत्र्याची खुर्ची धोक्यात?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp