Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोली महावितरणचा थेट ‘शहरी’ विभागात समावेश’! आमदार माऊली कटके यांच्या पाठपुराव्याला यश; तीन शाखा ग्रामीणमधून शहर विभागात

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 16 October 2026, 15:23

वाघोली : झपाट्याने वाढणाऱ्या वाघोलीतील वीज वितरण व्यवस्थेला सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार ज्ञानेश्वर (माऊली आबा) कटके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महावितरणच्या वाघोली, साईसत्यम आणि विठ्ठलवाडी-वाघोली या तीन शाखांचा ग्रामीण विभागातून रस्तापेठ शहर मंडळांतर्गत समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश महावितरणने जारी केला असून, या निर्णयामुळे परिसरातील वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक सक्षम प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

महावितरणच्या आदेशानुसार, पुणे ग्रामीण मंडळातील मुळशी विभागाच्या हडपसर ग्रामीण उपविभागांतर्गत असलेल्या या तीन शाखांचा कार्यभार आता रस्तापेठ शहर मंडळातील नगररोड विभागाच्या विश्रांतवाडी उपविभागाकडे सोपविण्यात आला आहे. महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भूषण कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने 17 सप्टेंबर 2026 रोजी हा आदेश निर्गमित करण्यात आला.

या बदलामध्ये वाघोली शाखेतील 25 हजार 665, साईसत्यम शाखेतील 27 हजार 759 आणि विठ्ठलवाडी-वाघोली शाखेतील 24 हजार 902 अशा एकूण 78 हजार 326 वीजग्राहकांचा समावेश आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्येतील वाढ आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेता, या शाखांचे शहरी विभागात वर्गीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.

वाघोली परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्या, देखभाल-दुरुस्ती, ग्राहकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे हाताळले जावे, यासाठी आमदार कटके यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ऊर्जा मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

वाघोलीची वाढती लोकसंख्या आणि ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन येथे स्वतंत्र उपविभाग कार्यालय सुरू करण्यासाठीही प्रस्ताव मुंबई येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे आमदार कटके यांनी सांगितले. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वीजबिल दुरुस्ती, नवीन वीजजोडणी आणि इतर तक्रारींसाठी नागरिकांना दूरच्या कार्यालयांत जाण्याची गरज कमी होऊ शकते. मात्र, स्वतंत्र कार्यालयाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप अपेक्षित आहे.

आमदार माऊली आबा कटके म्हणाले, “वाघोलीचे नागरीकरण वेगाने होत असून, वीजग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणे आणि नागरिकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण होणे आवश्यक होते. तीन शाखांचा शहर विभागात समावेश व्हावा, यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि ऊर्जा मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश मिळाल्याचा आनंद आहे. या निर्णयामुळे अतिरिक्त मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. स्वतंत्र उपविभाग कार्यालयासाठीही प्रस्ताव पाठविला आहे. वाघोलीकरांना वीजबिल दुरुस्ती, नवीन जोडणी आणि इतर तक्रारींसाठी स्थानिक पातळीवर सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हल्ला प्रकरणात मोठा खुलासा! पप्या शिंदे चप्पलऐवजी बूट घालून का आला? समोर आलं धक्कादायक कारण.

Friday, 16 October 2026, 17:03

पत्रकारांनो आंदोलनाच्या कव्हरेजसाठी जाताय? पत्रकारांसाठी आंदोलनांच्या कव्हरेजबाबत नियमावली जारी; भारतीय प्रेस परिषदेचा मोठा निर्णय

Friday, 16 October 2026, 16:36

मोठी अपडेट! ‘आपले सरकार’ पोर्टल 21 ऑक्टोबरपर्यंत बंद; नागरिकांची कामं ठप्प, नेमकं कारण काय?

Friday, 16 October 2026, 16:33

ऐकलं का? दिवाळीअगोदर ‘हे’ महत्वाचं काम करा नाहीतर फराळ विसरा; गॅस सबसिडीबाबत ‘या’ महत्वाच्या अपडेट करा नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Friday, 16 October 2026, 16:10

फिल्म इंडस्ट्रीत कामाचं आमिष, खासगी व्हिडीओची धमकी अन् 1 कोटींचा उल्लेख;विरारमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य…

Friday, 16 October 2026, 15:52

दिवाळीअगोदर शेतकऱ्यांना मिळणार ५ हजार रुपये! नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत मोठी माहिती समोर; वाचा सविस्तर…

Friday, 16 October 2026, 15:43
Next Post

सरकारी कर्मचाऱ्यांनो शिपायापासून ते सचिवांपर्यंत सरसकट सर्वांचाच पगार वाढणार? ८व्या वेतन आयोगाबद्दल मोठी अपडेट; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp