Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये पडद्यामागच्या ‘रामदूतां’मुळे श्रीराम सोहळा उत्साहात संपन्न ; जिवंत ‘नरसिंह अवतार’ आणि ‘केरळ नृत्य’ ठरले विशेष आकर्षण..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 March 2026, 18:50

उरुळी कांचन, ता. 27 : “प्रभू श्रीरामचंद्र की जय…” अशा जयघोषात आणि अलोट गर्दीत उरुळी कांचन पंचक्रोशीतील रामनवमी शोभायात्रा आणि श्रीराम पादुका दर्शन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हजारो महिला, बालके आणि नागरिकांची उपस्थिती असूनही, कोठेही हुल्लडबाजी न होता अत्यंत शिस्तीत हा सोहळा पार पडल्याने उरुळी कांचनने जिल्ह्यासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.

यंदाच्या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे प्रथमच सादर करण्यात आलेला ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच, मिरवणुकीत खास आकर्षण म्हणून सादर करण्यात आलेले ‘केरळ नृत्य’ सर्वांचे डोळे दिपवून टाकत होते. आकर्षक सजावट, डोळे दिपवणारी विद्युत रोषणाई आणि ‘राजदत्त साऊंड अँड लाईट’च्या दर्जेदार सेवेने मिरवणुकीत रंगत भरली. सोहळ्याच्या शेवटी करण्यात आलेल्या भव्य फटाक्यांच्या आतिशबाजीने आकाश उजळून निघाले होते.

 

साधारणपणे मोठ्या मिरवणुकांमध्ये पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, उरुळी कांचनमध्ये चित्र वेगळे होते. रस्ते भाविकांनी गच्च भरले असतानाही प्रत्येकाने आपल्या शिस्तीचे भान राखले. या संयमामुळे पोलीस प्रशासनाला कोणालाही शिस्त लावण्याची साधी वेळ आली नाही. अलोट गर्दी असूनही शांततेत पार पडलेला हा सोहळा उरुळी कांचनच्या सुजाण नागरिकत्वाचे दर्शन घडवून गेला.

या अभूतपूर्व नियोजनाचे खरे श्रेय पडद्यामागून काम करणाऱ्या तरुणांना जाते. स्वतःचे नाव कुठेही पुढे न येऊ देता, गेल्या अनेक वर्षांपासून हे तरुण अहोरात्र राबत आहेत. उत्सवाच्या नियोजनापासून ते खर्चापर्यंत आणि मिरवणुकीच्या शिस्तीपासून ते भाविकांच्या सोयीपर्यंत प्रत्येक गोष्टीत या ‘रामभक्तांच्या फौजेने’ स्वतःला झोकून दिले होते.

आदर्श सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा
आजच्या काळात जिथे लहान कार्यक्रमातही गोंधळ होतो, तिथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अशा प्रकारे शिस्तबद्ध आणि भव्य शोभायात्रा निघणे, हे संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. उरुळी कांचनच्या या नियोजनबद्ध कार्यकर्त्यांचे आणि शिस्तप्रिय नागरिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54
Next Post
Horrific incident in a cat! Woman came to remove a lump but doctors removed the amniotic sac; Anticipatory bail of 5 doctors rejected

मांजरीतील भयानक प्रकार! महिला गाठ काढण्यासाठी आली पण डॉक्टरांनी गर्भपिशवीच काढली; 5 डॉक्टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.