Saturday, September 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 15 May 2026, 14:27

Big Breaking पुणे, ता. १५ : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) बैठकीत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी प्रशासनासमोर ग्रामीण पुण्याच्या प्रश्नांचा अक्षरशः पाढाच वाचला. पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गांच्या कामांमुळे भविष्यात वाहतुकीचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता व्यक्त करत, “काम सुरू करण्यापूर्वी वाढीव लेन तयार करा, अन्यथा पुणेकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल,” असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला. Big Breaking

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे ही महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या अंतिम विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. मात्र बैठकीचा केंद्रबिंदू ठरले ते राहुल कुल यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि प्रशासनावर केलेला थेट हल्लाबोल. Big Breaking

बैठकीत बोलताना राहुल कुल यांनी महामार्गांवरील वाहतूक कोंडीचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्ग आधीच वाहनांच्या ताणाखाली दबले आहेत. त्यात उन्नत मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट होईल. त्यामुळे प्रशासनाने आधीच रस्त्याच्या बाजूला वाढीव लेन तयार करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली. वाहतुकीच्या प्रश्नावर योग्य नियोजन न झाल्यास नागरिकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. Big Breaking

ग्रामपंचायत इमारतींपासून स्मशानभूमीपर्यंत रखडलेल्या कामांवर संताप
ग्रामीण भागातील रखडलेल्या विकासकामांवरही राहुल कुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांची अनेक कामे वर्षानुवर्षे रखडल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. प्रशासनाने कागदोपत्री विकास न दाखवता प्रत्यक्ष कामे पूर्ण करावीत,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. Big Breaking

 

“ई-निविदेशिवाय खरेदी नको”; विकासकामांत पारदर्शकतेवर भर
दिव्यांग बांधवांसाठीचे साहित्य वाटप आणि खेळाडूंसाठी क्रीडा साहित्य खरेदी करताना ‘ई-निविदा’ प्रणाली सक्तीची करण्याची मागणीही त्यांनी केली.“पारदर्शकता आणि दर्जेदार साहित्य मिळण्यासाठी सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाईन आणि खुल्या पद्धतीने व्हायला हव्यात,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मंजूर विकासकामे ठरलेल्या वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. Big Breaking

पुणे जिल्ह्यासाठी ‘पर्यटन मास्टर प्लॅन’ची मागणी
पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख करत राहुल कुल यांनी जिल्ह्यासाठी स्वतंत्र पर्यटन आराखडा तयार करण्याची मागणी केली. “पुण्याला गडकिल्ले, धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. योग्य नियोजन झाल्यास पर्यटनातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले. यासोबतच ‘किल्ले संवर्धन विशेष मोहीम’ राबवून ऐतिहासिक वारसा जपण्यावर भर देण्याची मागणी त्यांनी केली.

रिंग रोड, अष्टविनायक महामार्ग आणि वृक्षारोपणावरही भर
पर्यावरण संरक्षणाचा मुद्दाही राहुल कुल यांनी बैठकीत जोरदारपणे मांडला. प्रस्तावित रिंग रोड, गडकिल्ले परिसर आणि अष्टविनायक महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी इलेक्ट्रिक पंप मंजूर करण्याचा विषयही त्यांनी प्रशासनासमोर ठेवला. Big Breaking

बैठकीत प्रशासनावर प्रश्नांचा भडिमार
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राहुल कुल यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती समोर आली आहे. डीपीडीसी बैठकीत राहुल कुल यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ग्रामीण पुण्याच्या प्रश्नांना पुन्हा एकदा राजकीय केंद्रस्थानी स्थान मिळाले आहे. Big Breaking

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश! विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय जाहीर

Friday, 4 September 2026, 22:53

अभिजीत दिपकेंचं नवं टार्गेट ठरलं! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता CJPची ‘या’ मुद्द्यावर मोठी मोहीम,नवी रणनीती काय?

Friday, 4 September 2026, 22:21

मावशी, साप आला!’ म्हणत 65 वर्षीय आजीचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या, आजीने मानले पोलिसांचे आभार..

Friday, 4 September 2026, 21:53

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास मंडळावर कारवाई होणार ; पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर

Friday, 4 September 2026, 21:27

नागपुरात DJ बंदीला केराची टोपली! लेझरच्या रोषणाईत दणदणाटात दहीहंडी उत्सव; नियम धाब्यावर

Friday, 4 September 2026, 21:09

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! ऑगस्टचा ₹1,500 हप्ता ‘या’ तारखेनंतर खात्यात; मोठी अपडेट समोर

Friday, 4 September 2026, 19:46
Next Post

Kontoerstellung und Bestätigung im Cowboy Spin Casino: Ihr Zugang zum Spielvergnügen

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp