Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दहीहंडी-ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा ‘अलर्ट’; विनापरवाना डीजे व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – डीसीपी उपायुक्त जीवन बेनीवाल

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 16 August 2026, 16:54

पुणे, ता. 16 : आगामी दहीहंडी आणि ईद सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. परिमंडळ सहा हद्दीत सण-उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी मोहल्ला कमिटी, शांतता कमिटी आणि मौलवींना पोलिसांनी स्पष्ट सूचना दिल्या असून, विनापरवाना डीजे, ध्वनीप्रदूषण, वाहतुकीला अडथळा आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. असा इशारा पुणे परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन देवाशिष बेनीवाल यांनी दिला आहे.

पुणे परिमंडळ सहा कार्यालयात आगामी सणांच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. १४) दुपारी बैठक घेण्यात आली होती. यावेळी बेनीवाल यांनी वरील इशारा दिला आहे. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार नवगिरे, अनुराधा उदमले व परिमंडळ सहा मधील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व एलआयबीचे अंमलदार उपस्थित होते.

‘डीजेला नो एन्ट्री’; नियम तोडल्यास थेट जप्ती

सण-उत्सवाच्या काळात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे सार्वजनिक उपद्रव, भांडण अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ध्वनीप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर प्रचलित कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असून, सणांच्या कालावधीत कोणत्याही परिस्थितीत डीजेचा वापर करता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. विनापरवाना डीजे वाजविणाऱ्या चालकांवर कारवाई करून संबंधित डीजे जप्त करण्याची कठोर कार्यवाही केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांना थारा नाही

सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे कोणतेही कृत्य करू नये. तसेच अश्लील, आक्षेपार्ह, धार्मिक भावना दुखावणारे किंवा जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. याशिवाय सणांच्या मिरवणुका व कार्यक्रमांदरम्यान वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही, याची आयोजकांनी दक्षता घ्यावी. पोलिसांनी दिलेल्या वाहतूक व मार्गासंबंधी सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

परवानगीतील अटींचा भंग महागात पडणार

कार्यक्रमासाठी दिलेल्या परवानगीतील अटींचा भंग झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, ध्वनिक्षेपक व इतर उपकरणे जप्त करण्याची कारवाई होऊ शकते. पोलिसांच्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, आगामी दहीहंडी व ईद उत्सव शांतता, सलोखा आणि बंधुभावाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “सण साजरे करा; मात्र कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहोचेल असे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. विनापरवाना डीजे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा पुणे परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त जीवन देवाशिष बेनीवाल यांनी दिला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईच्या पॉश एरियात भरधाव कारचा कहर! तिघांना उडवलं; पत्नीच्या डोळ्यांसमोर पतीचा दुर्दैवी अंत

Tuesday, 29 September 2026, 22:22

पूजा खेडकर प्रकरणात मोठी कारवाई! वडील दिलीप खेडकर यांच्या घरावर ACBचा छापा,नेमकं काय सापडलं?

Tuesday, 29 September 2026, 22:04

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54
Next Post

श्रीमंत बनण्यासाठी तरुणाने निवडला शॉर्टकट! पोलिसांनी ३०० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् पुण्यात हायटेक चोरीचा पर्दाफाश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp