Friday, August 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

OLXवर ‘सेकंड ओनर’चा बनाव; बुलेट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांचा ऑनलाइन गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 7 August 2026, 16:47

पुणे, ता. ७ : ऑनलाइन वाहन खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकालाच सायबर भामट्याने चलाखीने जाळ्यात ओढत तब्बल १ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल GT-650 दुचाकी विक्रीच्या बहाण्याने स्वतःला ‘सेकंड ओनर’ असल्याचे सांगत आरोपीने विश्वास संपादन केला. पैसे ऑनलाइन घेतल्यानंतर गाडी देण्यास नकार देत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी भाग्येश राजेंद्र झोरी (वय २४, रा. सेनापती बापट रोड, पुणे) यांनी तक्रार दिली असून दिनेश वर्मा (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात, मोबाईल क्र. 9780451629) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भाग्येश झोरी हे बावधन येथे जुन्या दुचाकींच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. सोशल मीडियासह त्यांच्या वेब पोर्टलद्वारे ग्राहकांशी संपर्क साधून व्यवहार केले जातात.

२३ जुलै रोजी त्यांच्या व्यावसायिक क्रमांकावर एका व्यक्तीकडून रॉयल एनफिल्ड कॉन्टिनेंटल GT-650 (क्रमांक 23BH8536F) विक्रीसाठी असल्याची माहिती आली. दुसऱ्या दिवशी आरोपीने स्वतःचे नाव दिनेश वर्मा असल्याचे सांगत तो गाडीचा सेकंड ओनर असल्याचा दावा केला. गाडी खराडी येथील सोसायटीत पाहण्यासाठी बोलावण्यात आले. तेथे विक्रांत भारद्वाज नावाच्या व्यक्तीने गाडी दाखवून टेस्ट राईडलाही दिली. सर्व कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवून आरोपीने विश्वास संपादन केला.

सुरुवातीला दीड लाख रुपये मागणाऱ्या आरोपीने वडिलांच्या उपचारासाठी तातडीने पैशांची गरज असल्याचे कारण सांगत व्यवहार १.३० लाख रुपयांत निश्चित केला. मात्र, मूळ आरसी कार्ड उपलब्ध नसल्याने फिर्यादीने २० हजार रुपये रोखून ठेवत १.१० लाख रुपये ऑनलाइन आरोपीने पाठवलेल्या QR स्कॅनरवर जमा केले.

 

पैसे मिळाल्यानंतर मात्र आरोपीने गाडी ताब्यात देण्यास टाळाटाळ केली. यानंतर स्थानिक पोलिसांना बोलावण्यात आले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. विक्रांत भारद्वाज हा आरोपीचा मित्र नसून गाडीच्या मूळ मालकाचा मित्र असल्याचे स्पष्ट झाले. OLX वरील जाहिरात पाहून दिनेश वर्माने त्याच्याशी संपर्क साधला होता आणि जास्त किंमत मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याचाही विश्वास जिंकला होता.

यामुळे आरोपीने एकाच वेळी गाडीचा मूळ मालक, त्याचा मित्र आणि खरेदीदार अशा तिघांचीही दिशाभूल करून पैसे स्वतःच्या खात्यात वळविल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, फिर्यादीने भरलेल्या १.१० लाख रुपयांपैकी एक रुपयाही मूळ मालकाला मिळाला नसल्याचे तपासात समोर आले.

दरम्यान, या प्रकरणामुळे ऑनलाइन वाहन खरेदी-विक्री करताना केवळ कागदपत्रे किंवा व्हॉट्सॲपवरील माहितीवर विश्वास न ठेवता, मूळ मालकाशी प्रत्यक्ष संपर्क करून आणि रक्कम थेट त्याच्याच खात्यात जमा करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

OLXवर ‘सेकंड ओनर’चा बनाव; बुलेट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांचा ऑनलाइन गंडा

Friday, 7 August 2026, 16:47

बारामतीत ‘दृश्यम’ स्टाईल थरार! नवऱ्याला जिवंत पुरण्याचा बायकोचा प्लॅन; खड्डा खणला, मजुरांना बोलावलं, खड्ड्यात हालचाल झाली अन्…

Friday, 7 August 2026, 16:43

पिस्तुलाचा ट्रिगर दाबला… पण गोळी अडकली; शिरूरमध्ये थरारक जीवघेणा हल्ला

Friday, 7 August 2026, 16:21

15 ऑगस्टआधी मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा! महापौरांना धमकीचा ई-मेल, ‘ही’ ठिकाणं निशाण्यावर

Friday, 7 August 2026, 16:16

निष्काळजीपणाने घेतला निष्पापाचा बळी! गाडीचा दरवाजा उघडताना केलेली एक चूक जीवावर बेतली; फूड डिलिव्हरी बॉयचा करुण अंत

Friday, 7 August 2026, 15:53

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा

Friday, 7 August 2026, 15:38
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.