Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसीलदाराच्या निरोप समारंभ प्रकरणी महसूल मंत्रालयाची थेट दखल; विभागीय आयुक्तांना चौकशीचे स्पष्ट आदेश

योगेश मारणेby योगेश मारणे
Saturday, 29 November 2025, 21:56
Revenue Ministry takes direct note of the farewell ceremony of the resident deputy tehsildar at Shirur tehsil office; Clear order to the divisional commissioner to investigate

न्हावरे: शिरूर तहसिल कार्यालयात (Shirur Tahasil Office) 1 जुलै 2025 रोजी कार्यालयीन वेळेतच तत्कालीन निवासी नायब तहसिलदाराचा निरोप समारंभ आयोजित केला होता. त्यानंतर “कार्यालयीन वेळेत काम थांबवून शिरूरच्या निवासी नायब तहसीलदारांच्या निरोप समारंभाचा थाट” या मथळ्याखाली शासनच्या नियमांचे उघड उल्लंघन झाल्यामुळे 3 जुलै 2025 रोजी ‘पुणे प्राईम न्यूज’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. या गंभीर गैरप्रकाराची दखल आता थेट महसूल मंत्रालयाने घेतली आहे.

 

‘पुणे प्राईम न्यूज’च्या बातमीच्या आधारे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी या संदर्भात केलेल्या तक्रारीला मुख्यमंत्री सचिवालयाने महत्त्व देत महसूल विभागाला ईमेलद्वारे चौकशीबाबत निर्देश दिले. त्यानंतर वाळुंज यांनी मंत्रालयाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानुसार महाराष्ट्र शासनाचे उपसचिव बनकर यांनी तक्रारीची अधिकृत नोंद घेऊन पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली.

यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग मंत्रालयाने बुधवारी (ता.26) पुण्याच्या विभागीय आयुक्तांना लेखी स्वरूपात स्पष्ट आदेश काढले असून, तक्रारीतील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने नियोमोचित कार्यवाही करून चौकशी अहवाल 31 डिसेंबर 2025 पर्यंत थेट शासनास सादर करणे बंधनकारक असल्याचे कक्ष अधिकारी स्मिता पवार यांनी विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या चौकशी पत्रामध्ये नमूद केले आहे.

या गंभीर प्रकरणात मंत्रालयाने घेतलेली तातडीची दखल हे दाखवून देते की, जागरूक नागरिकांनी आवाज उठवल्यास प्रशासनातील मनमानीवर अंकुश ठेवणे शक्य होते, तसेच ठोस पाठपुराव्यानंतर शासनालादेखील कारवाई करणे भाग पडते. त्यामुळे शिरूर तहसिल कार्यालयातील नियमभंग प्रकरणाची चौकशीआता वरिष्ठ अधिकारीस्तरावर अपरिहार्य झाली आहे.

दरम्यान, विविध सामाजिक तक्रारींवर “मी स्वतः शिरूरला येतो” असे आश्वासन पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी यांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांना दूरध्वनीवरून दिले होते. मात्र, अनेकदा स्मरण करूनही हे आश्वासन पूर्ण झाले नाही. याउलट विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना आधीच चौकशी निर्देश जारी केले आहेत आणि आता महसूल मंत्रालयानेही थेट आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या गंभीर नियमभंग प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई कधी सुरू होणार, हा प्रश्न नागरिकांतून अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे. त्यामुळे शिरूर तहसिल कार्यालयातील गोंधळ आणि नियमभंगाच्या चौकशीसाठी आता सर्वांचे लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Pune Forest Department

पुणे वनविभागातील कार्यक्षेत्रांची पुनर्रचना; बिबट-मानव संघर्ष कमी..,'हे' चार सुधारित कार्यक्षेत्र

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.