Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवैध माती उपशामुळे दौंड-शिरूर सीमेवर धुमाकूळ; डुप्लिकेट रॉयल्टी पावत्यांचीही चर्चा

योगेश मारणेby योगेश मारणे
Tuesday, 6 October 2026, 18:22

न्हावरे: दौंड व शिरूर तालुक्यांच्या सीमेलगत दौंड तालुक्यातील वाळकी,पिराचीवाडी आणि परिसरातील गावांच्या शेतजमिनींमधून जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर मातीचा उपसा करून त्याची वाहतूक शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस परिसरातील रस्त्यांवरून दररोज सुमारे ५० ते ६० हायवा-डंपरमधून होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.

या ओव्हरलोड वाहतूकीचा सर्वाधिक फटका रांजणगाव सांडस–नागरगाव फाटा रस्त्याला बसला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या कडेला चर पडले आहेत. ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यावर टाकलेली खडी बाजूला गेली असून, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे.

रॉयल्टीच्या पावत्यांवरही संशयाची सावली

मोठ्या प्रमाणावर मातीची वाहतूक करणाऱ्या काही हायवा चालकांकडे डुप्लिकेट रॉयल्टीच्या पावत्या असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे संबंधित वाहन चालकांकडे असलेल्या रॉयल्टी पावत्यांची महसूल विभागाने प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. कोणत्या ठिकाणची माती, किती प्रमाणात आणि कोणत्या परवानगीच्या आधारे वाहतूक केली जात आहे, याचीही शिरूर आणि दौंडच्या महसूल विभागाने एकत्रित तपासणी करावी अशी मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतानाही अनेक वाहनांकडे वैध रॉयल्टी पावत्या नसल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण वाहतुकीची महसूल विभागाने सखोल चौकशी केल्यास वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे. माती वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उठत आहेत. सकाळ, दुपार आणि सायंकाळच्या वेळेत या मार्गावर मोठी वर्दळ असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनाही धुळीमुळे रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे.

 

दौंड-शिरूर सीमेवर संयुक्त पथकाची मागणी

अवैध माती उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी दौंड आणि शिरूर तालुक्यांच्या सीमेवर महसूल विभागाने संयुक्त पथक नेमून तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी योगेश रणदिवे यांनी केली आहे. तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे खराब झालेला रांजणगाव सांडस–नागरगाव फाटा रस्ता संबंधित मातीचोर अथवा जबाबदार घटकांकडून दुरुस्त करून घ्यावा, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, महसूल विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन माती उपशाची परवानगी, रॉयल्टी पावत्या, पावत्यांची सत्यता, वाहतूक करणाऱ्या वाहनांची क्षमता आणि संबंधित ठिकाणचा माती उपसा यांची संयुक्त तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे.

वाहतूक शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस गावातून होत असल्यामुळे न्हावऱ्याचे मंडलाधिकारी प्रशांत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला अवघ्या काही दिवसांवर! सुप्रीम कोर्टातून सर्वात मोठी बातमी; दसऱ्यापूर्वी निकाल लागण्याचे स्पष्ट संकेत

Tuesday, 6 October 2026, 18:41

मुंबईत दिवाळीआधीच फटाक्यांना ‘नो एंट्री’! पोलिसांचा कडक इशारा, नियमावली जाहीर

Tuesday, 6 October 2026, 18:36

अवैध माती उपशामुळे दौंड-शिरूर सीमेवर धुमाकूळ; डुप्लिकेट रॉयल्टी पावत्यांचीही चर्चा

Tuesday, 6 October 2026, 18:22

“पुणे बंद करून दाखवाच!” महापौरांचं MPSC आंदोलकांना थेट खुलं आव्हान; आंदोलन पेटणार?

Tuesday, 6 October 2026, 18:16

सोमेश्वरमध्ये अजितदादांच्या नावावरून वाद चिघळला; जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट ‘अल्टिमेटम’

Tuesday, 6 October 2026, 17:58

टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाज दीर्घकाळ संघाबाहेर,समोर आलं मोठं कारण…

Tuesday, 6 October 2026, 17:31
Next Post

मुंबईत दिवाळीआधीच फटाक्यांना ‘नो एंट्री’! पोलिसांचा कडक इशारा, नियमावली जाहीर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp