Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काजू-बदाम, तूपावर डल्ला; सुपरमार्केटमध्ये महागड्या वस्तू उचलायचे अन् क्षणात गायब व्हायचे; वाकड येथील टोळीकडून 7 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 5 September 2026, 14:53

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात सुपरमार्केटमधून महागड्या वस्तू चोरणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4 महिलांसह 7 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 7 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही टोळी कार आणि रिक्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अटक केलेल्यांमध्ये रविकांत देवानंद जाकरे, ब्रिजेश सीताराम मदेशिया, ब्रिजेश बाळू यादव, सोनम बाबू शेख, सानिया बाबूमिया शेख, रुमा ब्रिजेश मदेशिया आणि सलमा शकील शेख यांचा समावेश आहे. सलमा शेख यांचे वय 71 वर्षे असून त्या भोसरीतील बालाजीनगर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीचे मुख्य लक्ष्य सुपरमार्केटमधील महागड्या वस्तू असायच्या. काजू, बदाम, तूप आणि इतर ड्रायफ्रूट्स चोरून नेण्यासाठी आरोपी दुकानात प्रवेश करायचे. गर्दीचा फायदा घेत काही वेळातच वस्तू लंपास करून ते वाहनातून पसार होत होते.

घटनांचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील अनेक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित वाहनांचा माग काढण्यात आला. कार मुंबईच्या दिशेने गेल्यानंतर पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ताथवडे-वाकड परिसरात सापळा रचला. कार आणि रिक्षासह सातही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी चोरीच्या घटनांची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ अखेर उकललं! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Sunday, 27 September 2026, 21:03

शरद पवार पुन्हा मैदानात! मुख्यमंत्री फडणवीसांना थेट पत्र; कोणत्या 17 मागण्यांचा उल्लेख?

Sunday, 27 September 2026, 20:44

पुण्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; 52 वर्षीय कंत्राटी कामगार पोलिसांच्या ताब्यात,सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक अन्…….

Sunday, 27 September 2026, 20:06

खराडीत विनापरवाना डीजेवर पोलिसांचा दणका; चार जणांविरुद्ध गुन्हा तर लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sunday, 27 September 2026, 19:39

3 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार? उद्यापासून कर्मचाऱ्यांचा संप; ATM- UPI बाबत महत्त्वाची अपडेट

Sunday, 27 September 2026, 18:32

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपणार! भाजपचे उमेदवार 48 तासांत जाहीर होणार?

Sunday, 27 September 2026, 17:48
Next Post

दहीहंडीचा जल्लोष महागात पडला! पुण्यात पहिला गुन्हा दाखल, आता मंडळावर कारवाईची टांगती तलवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp