Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Revenue Department Staff Transfers : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केलेल्या बदल्या पारदर्शकच; पण ‘झारीतील शुक्राचार्यांनी’लावला सुरुंग?

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 June 2026, 11:23
19 nayab tahsildar transfers in marathwada

संदीप बोडके
Pune Revenue Department Staff Transfers पुणे, ता. २२ : पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महसूल विभागातील बदल्यांमध्ये पारदर्शकता आणत राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला. वशिलेबाजी, राजकीय दबाव आणि घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी त्यांनी समुपदेशनाची अभिनव पद्धत अवलंबल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्यांच्या याच पारदर्शक कारभाराला त्यांच्या अधिपत्याखालील काही ‘झारीतील शुक्राचार्यांनी’ सुरुंग लावल्याची चर्चा महसूल विभागात रंगू लागली आहे. Pune Revenue Department Staff Transfers

ग्राम महसूल अधिकारी, लिपीक आणि अव्वल कारकून यांच्या नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये समुपदेशनावेळी निश्चित झालेल्या नियुक्त्या आणि प्रत्यक्षात जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये तफावत आढळून आल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. Pune Revenue Department Staff Transfers

मिळालेल्या माहितीनुसार, समुपदेशन प्रक्रियेत दोन कर्मचाऱ्यांना इंदापूर तालुक्यात नियुक्ती देण्याचा निर्णय अंतिम झाला होता. मात्र, प्रत्यक्ष बदली आदेशात त्यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयासाठी निश्चित झालेल्या एका कर्मचाऱ्याची नियुक्ती पुरंदर तालुक्यातील मंडल अधिकारीपदी करण्यात आली आहे. तसेच एका ग्राम महसूल अधिकाऱ्याचा तलाठी सजाही बदलण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून समोर आली आहे. Pune Revenue Department Staff Transfers

 

या घडामोडींनंतर कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप समूहांवर नाराजी व्यक्त होऊ लागली असून, “झारीतील शुक्राचार्य नेमके कोण?” याबाबत महसूल विभागात खमंग चर्चा रंगली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून हा फेरफार केला का? तसेच या बदलांमागे नेमके कोणते कारण आहे? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्याने संशय अधिक गडद होत आहे. Pune Revenue Department Staff Transfers

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या स्वच्छ प्रतिमा आणि कडक शिस्तीच्या कारभाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत असताना, त्यांच्या नावाला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांकडून झाला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकारी वरिष्ठ पदांवर असल्याने कर्मचाऱ्यांना उघडपणे बोलता येत नसून, तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची भावना व्यक्त होत आहे. Pune Revenue Department Staff Transfers

दरम्यान, आता या कथित फेरफारामागील सत्य काय, जिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली होती का आणि या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. Pune Revenue Department Staff Transfers

बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची धावपळ?
बदल्यांमधील कथित घोटाळ्याबाबत पुणे प्राईम न्यूजने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, या वृत्तानंतर अवघ्या बारा तासांच्या आत तब्बल पाच नोटिसा बजावून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु, हीच कार्यतत्परता बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखताना आणि कथित गैरप्रकार रोखताना दाखवली असती, तर त्याचा निश्चितच फायदा सर्वसामान्य नागरिकांसह महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाही झाला असता, अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. Pune Revenue Department Staff Transfers

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ज्या घटनेने संपूर्ण पुणं हादरलं होतं त्या प्रकरणाचा उद्या निकाल! गुन्हा घडला… तपास झाला… आता शिक्षेची वेळ! नसरापूर केसमध्ये उद्या ‘काय’ घडणार?

Wednesday, 24 June 2026, 23:01

बारामती ‘होळकर’ रुग्णालय प्रशासन ढवळून निघाले! त्रुटींवरून थेट बदलीचा दणका; सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर १६ दिवसांत मोठी कारवाई

Wednesday, 24 June 2026, 22:29

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला अटक; यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Wednesday, 24 June 2026, 22:00

पहिले विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ अन् नंतर ‘तिहेरी तलाक’; विवाहितेची पोलीस ठाण्यात धाव

Wednesday, 24 June 2026, 21:35

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले! मोफत पाणी न दिल्यास होणार कारवाई; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश

Wednesday, 24 June 2026, 20:54

वाकड हादरले! आर्थिक विवंचनेतून मायलेकांचे सामूहिक आत्मदहन; ताथवडेतील घटनेने परिसरात शोककळा

Wednesday, 24 June 2026, 20:14
Next Post

Gold Silver Today Rates Update: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज! सोन्याच्या भावात तब्बल 10 हजारांची कपात; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.