पुणे: पुण्यात सायबर गुन्हेगारीने एका 68 वर्षीय (Pune News) ज्येष्ठ वकिलाला शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 14 कोटी 25 लाख 65 हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या फसवणुकीची सुरुवात एका साध्या मेसेज किंवा सोशल मीडिया लिंकवरून झाली. चोरट्यांनी स्वतःला शेअर बाजार तज्ज्ञ भासवून वकिलांशी संपर्क साधला. त्यांना एका विशिष्ट ‘इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म’वर गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दुप्पट-तिप्पट नफा मिळेल, असे स्वप्न दाखवले होते.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी आभासी नफा दाखवण्यात आला. याच नफ्याच्या मोहात पडून वकिलांनी आपली आयुष्यभराची पुंजी आरोपींच्या खात्यात जमा केली.
जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी ‘टॅक्स’ किंवा ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली अधिक पैशांची मागणी केली आणि अखेर संपर्क तोडला. दरम्यान, वकिलाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.







