पुणे: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर (Pune News) पुणे महापालिकेच्या निवडणुका वेळेत होण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे राजकीय हालचाली वाढल्या असून, इतर पक्षांतील सुमारे 21 माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यास उत्सुक आहेत. मात्र, कोणाला प्रवेश द्यायचा याचा अंतिम निर्णय भाजपची कोर कमिटी घेणार असल्यामुळे अनेकजण वेटिंग लिस्टमध्ये असल्याचे चित्र समोर आले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हे इच्छुक नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले असून समोर आलेल्या माहितीनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले कि, पक्षप्रवेश सोहळा 7 डिसेंबरनंतर होण्याची शक्यता आहे. प्रवेशाला होणाऱ्या या विलंबामुळे इच्छुकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेच्या निवडणुका जवळपास साडेतीन वर्षांपासून प्रलंबित होत्या, दरम्यान, राज्यात भाजपला अनुकूल असलेले राजकीय वातावरण आणि बिहारमधील यशाचा प्रभाव यामुळे अनेक नेते भाजपकडे आकर्षित होत आहेत. मात्र, पक्ष प्रवेशाला होत असलेल्या विलंबाने काही इच्छुकांनी त्यांच्या जाहीरात फलकांवरून भाजपचे नाव आणि चिन्ह हटविण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, किती जणांना भाजपात स्थान मिळाले ते लवकरच समोर येईल.







