प्रतिनीधी – संतोष पवार

Pune News: इंदापूर: शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार इंदापूर तालुक्यातील तीन शिक्षकेत्तर सेवकांना जाहीर करण्यात आला आहे. शिक्षकेत्तर क्षेत्रातील बहुमूल्य सेवेसाठी हा सन्मान देण्यात येतो.
हेही वाचा- पुण्यात ‘तू पोलिसांचा खबरी आहे’ म्हणत तिघांकडून ट्रकचालकावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार
अकोले (ता. इंदापूर) येथील अंकलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सेवक व इंदापूर तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे सचिव संपत संभाजी धायगुडे, निरा नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व सुधाकर गोविंद दंडवते कनिष्ठ महाविद्यालयाचे कनिष्ठ लिपिक नंदकुमार पाटील, तसेच निमसाखर येथील एन. ई. एस. हायस्कूल व ज्यू. कॉलेजचे वरिष्ठ लिपिक बरकतअल्ली आबू डांगे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रदान केला जाणार असून, संबंधित माहिती पुणे जिल्हा शिक्षकेत्तर सेवक संघाचे अध्यक्ष विनोद गोरे व सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दिली.
पुरस्कार वितरण सोहळा ७ डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता, पुण्यातील राष्ट्र सेवा दलाचे निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, सिंहगड रोड येथे आयोजित करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तिघा पुरस्कार्थ्यांचे इंदापूर तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय काळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव वाघ, तालुका उपाध्यक्ष यशवंत चव्हाण तसेच संघटनेच्या सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.






