अमित मुंडीक

पुणे: काळेपडळ परिसरात (Pune News) घडलेल्या एका घरफोडीच्या (Burglary) प्रकरणात काळेपडळ पोलिसांनी (Pune Police) जलद कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. काळेपडळ पोलीस तपास पथकाने अवघ्या काही दिवसांत पसार झालेल्या मुख्य आरोपीला अटक करून, चोरीला गेलेला 9 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी या चोरीचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचा (Technical Analysis) प्रभावीपणे केल्यामुळे आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. मुस्तफा शकील अन्सारी (वय 41, रा. जवाहरगंज, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला कोंढवा परिसरातून ताब्यात घेतले आहे.

9 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपी मुस्तफा अन्सारी याच्याकडून पोलिसांनी चोरीला गेलेला मोठा ऐवज जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 9 लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (Bike) आणि मोबाईल फोन यांचा समावेश आहे. काळेपडळ तपास पथकाने अत्यंत कमी वेळेत ही उत्कृष्ट कामगिरी करून दाखवल्याने त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.







