लोणी काळभोर: नववीच्या वर्गात शिक्षण घेत (Pune News) असलेल्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सूर्या पार्क परिसरात घडली असून सोमवारी (ता.5) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. (Kadamwakwasti News)

यश संतोष जाधव (वय – अंदाजे 15) असे आत्महत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यश हा हडपसर येथील साधना शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. यशचे आई वडील व भाऊ हे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कामावर निघून गेले होते. यश हा घरी एकटाच होता व नेहमीप्रमाणे तो सकाळी अकरा वाजता शाळेत जाणार होता.
दरम्यान, यशचे वडील संतोष जाधव हे कामावरून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घरी आले. तेव्हा यश हा घरात फॅनच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. व घटनास्थळी खुर्ची पडलेली होती.या घटनेमुळे जाधव कुटुंबाला धक्का बसला आहे. नागरिकांनी या घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने मृतदेह ताब्यात घेतला आहे.
यशने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आले नसले तरी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.







