Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Accident: थेऊर येथे ट्रकने दिलेल्या धडकेत 9 दुचाकींचा चक्काचूर; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 November 2025, 18:05

Pune Accident: लोणी काळभोर, ता. 27 : थेऊर – कोलवडी रस्त्यावर ट्रकने 9 दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली आहे. ही घटना थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळ बुधवारी (ता. 26 ) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु, 9 दुचाकींचा चक्काचूर झाला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हेही वाचा– BREAKING NEWS: राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्वला थिटेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, पहा Video…

श्रीराम संतराम वरपे (वय 25, रा. कोरडेवाडी, पोस्ट विदा, जिल्हा बिड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी अजय मनोहर पवार (वय 33, रा. पाण्याच्या टाकी शेजारी थेऊर ता. हवेली जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय पवार हे थेऊर येथील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. पवार यांनी थेऊर स्मशानभुमीच्या बाहेर थेऊर ते कोलवडी रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क केली होती. तसेच गावातील इतर नागरीकांनीही त्या ठिकाणी मोटार सायकली पार्क केल्या होत्या. तेवढ्यात स्मशान भूमीच्या बाहेर रोडवर जोरात गाड्या धडकल्याचा आवाज आला. त्यावेळी सर्वजण पळत स्मशानभुमीच्या बाहेर आले. तेव्हा कोलवडीकडून थेऊरकडे जाणाऱ्या मोठ्या ट्रकने दुचाकींना जोराची धडक दिली होती.

दरम्यान, या अपघातात विजय पवार, विकास आण्णासो व्यवहारे व इतर 5 ते 6 जणांच्या मोटार सायकलींचा चक्काचूर झाला होता. ट्रकचालक श्रीराम वरपे याने त्याच्या ताब्यातील ट्रक हा वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करुन, ट्रक भरधाव वेगाने चालवून तसेच इतरांच्या जीवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने वाहन चालवून 9 मोटार सायकलींना धडक देऊन या अपघातास व वाहनांच्या नुकसाणीस कारणीभूत ठरला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ट्रकचालक श्रीराम वरपे याच्यावर भारतीय न्याय संहिता 281,324 (4),324 (5) व मोटार वाहन अधिनियम 184,119 व 177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बारगजे करत आहेत.

हेही वाचा- 100 हून अधिक अधिकारी, 5 दिवस तपास; तब्बल 200 कोटींहून अधिक बेहिशेबी मालमत्ता उघड..

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Crime News: 'Mom sends me to sleep with a neighbor at night' Mother's cruel act for money; School teacher reveals the incident

Crime News: 'आई मला रात्री शेजाऱ्यासोबत झोपायला पाठवते" पैशांसाठी आईचं निर्दयी कृत्य; शाळेतल्या शिक्षिकेमुळे प्रकार उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.