Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

येरवड्यातील हॉटेल गोल्डन लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना आले यश; दोन महिलांची सुटका

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 18 September 2026, 13:15

पुणे, ता. 18 : येरवडा परिसरातील लॉजमध्ये ग्राहकांना मुली पुरवून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचत कारवाई केली. शास्त्रीनगर येथील हॉटेल गोल्डन ए.आर.सी.वर छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी तीन मोबाईल क्रमांकांच्या धारकांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज राजेशाम सविता (रा.कात्रज पुणे) यांच्यासह तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर मारुती दळवी यांनी सरकारतर्फे येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गित्ते यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शारदा कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 14 सप्टेंबर रोजी कारवाईची तयारी केली.

पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट ग्राहक म्हणून तयार केले. त्याच्यामार्फत संबंधित एजंटशी संपर्क साधून मुलीची मागणी करण्यात आली. त्यावेळी एजंटने व्हॉट्सअॅपवर काही मुलींचे फोटो पाठवून त्यातील एकीची निवड करण्यास सांगितले. त्यानंतर शास्त्रीनगर येथील हॉटेल गोल्डन ए.आर.सी.मध्ये खोली बुक करण्यास सांगून मुलगी पाठविण्यासाठी 10 हजार रुपये ठरल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले.

बनावट ग्राहकाने ठरल्याप्रमाणे पैसे घेऊन हॉटेलमध्ये प्रवेश केला. मुलगी आल्यानंतर त्याने पोलिसांना ठरल्याप्रमाणे संदेश पाठविला. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. यावेळी एका खोलीत एक महिला आढळून आली. तिची चौकशी केल्यानंतर आणखी एका खोलीत दुसरी महिलाही वेश्याव्यवसायासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

पोलिसांच्या चौकशीत संबंधित महिलांनी मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधून वेश्याव्यवसायातून मोठ्या पैशांचे आमिष दाखवून आपल्याला लॉजवर पाठविले जात असल्याचे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम महिलांना देऊन उर्वरित रक्कम संबंधित व्यक्ती स्वतःकडे ठेवत असल्याचा आरोप आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 10,000 रुपये रोख रक्कम तसेच दोन कंडोम पाकिटे, असा एकूण 10,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही महिलांची सुटका करून त्यांना महिला पोलिसांच्या ताब्यात सुरक्षिततेसाठी देण्यात आले.

या प्रकरणी मोबाईल क्रमांक 9756549058 चा धारक तसेच 7709935896 आणि 7414927895 या क्रमांकांच्या धारक व वापरकर्त्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 143(2), 143(3), 3(5) तसेच अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मातोश्रीच्या गेटवर हायव्होल्टेज ड्रामा! दिशा सालियनचे वडील ठाकरेंना नोटीस देण्यासाठी धडकले ; म्हणाले, “सामान्य माणसाची ताकद ….

Saturday, 19 September 2026, 16:37

अष्टविनायक रांजणगाव देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदी चार विशेष प्रतिनिधींचा समावेश करा ; बाबुराव पाचंगेची मागणी

Saturday, 19 September 2026, 16:18

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पुण्याहून मुंबईत आला, पण परतीआधीच काळाचा घाला; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!

Saturday, 19 September 2026, 15:55

वर्गणी देण्यास नकार दिला अन् तरुणाचा पारा चढला! बोपखेलमध्ये 42 वर्षीय महिलेला शिवीगाळ करत मारहाण

Saturday, 19 September 2026, 15:38

उरुळी कांचन येथील ज्ञानेश्वरी कांचनची जिल्हास्तरावर झेप ; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींची कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी

Saturday, 19 September 2026, 15:24

विलास घुले हत्या प्रकरणात CID चा मोठा खुलासा! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला क्लीन चिट; चार्जशीटमध्ये काय?

Saturday, 19 September 2026, 15:06
Next Post

जरांगेंना डिफेंडर देणारा भोसले कोण? 2 लाखांचा फोन अन् ठेकेदारांची एंट्री; बारस्कारांचा थेट सवाल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp