Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीतील ‘पूजा’ आणि भिगवणमधील आनंद हॉटेलवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश; ११ महिलांची सुटका तर चौघांवर गुन्हे दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 June 2026, 16:42

पुणे, ता. १ : पुणे ग्रामीण पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक आणि देहव्यापाराविरोधात मोठी मोहीम राबवत बारामती आणि भिगवण परिसरात दोन स्वतंत्र धडक कारवाया केल्या. या कारवायांमध्ये एकूण ११ महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक, व्यवस्थापक आणि दलाल अशा चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही महिलांच्या नागरिकत्वाबाबतही संशय व्यक्त होत असल्याने तपासाला अधिक गती देण्यात आली आहे.

भिगवणजवळील मदनवाडी परिसरातील ‘आनंद हॉटेल लॉजिंग’ वर भिगवण पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून हॉटेलमध्ये प्रवेश केला. छाप्यादरम्यान दोन मुख्य आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी विजय रमेश भाले (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि विकास रामसुंदर कनोजिया (रा. उत्तर प्रदेश) यांच्याविरुद्ध भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये घेतले जात होते. त्यातील निम्मी रक्कम महिलांना देण्यात येत होती, तर उर्वरित रक्कम दलाल स्वतःकडे ठेवत होते. एका महिलेकडे दिवसाला १० ते १२ ग्राहक पाठवले जात असल्याची धक्कादायक माहितीही तपासात समोर आली आहे.

 

दरम्यान, या कारवाईत १० कंडोम पाकिटे, सात अँड्रॉइड मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मालाची किंमत सुमारे एक लाख रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या काही महिला बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे.

दुसरीकडे, बारामती एमआयडीसी परिसरातील ‘पूजा लॉजिंग अँड रेस्टॉरंट बार’ वर पुणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने स्वतंत्र कारवाई केली. या कारवाईत चार महिलांची सुटका करण्यात आली असून हॉटेल मालक रोहित अंकुश निकम (रा. इंदापूर) आणि व्यवस्थापक गजानन लक्ष्मणसिंग ठाकूर (रा. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी बोगस ग्राहक पाठवून सापळा रचला होता. पूर्वनियोजित संकेत मिळताच पोलिसांनी लॉजवर धाड टाकली. तपासादरम्यान महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उघड झाले. आरोपी ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातून आर्थिक लाभ मिळवत असल्याचेही समोर आले आहे.

पोलिसांनी कारवाईदरम्यान रोख रक्कम, मोबाईल फोन, ग्राहकांची नोंद असलेले रजिस्टर तसेच व्यवहाराशी संबंधित साहित्य जप्त केले. बोगस ग्राहकाला देण्यात आलेल्या चिन्हांकित नोटाही आरोपींकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या दोन्ही कारवायांमुळे पुणे जिल्ह्यात हॉटेल आणि लॉजिंगच्या आडून सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायांचे जाळे पुन्हा एकदा उघड झाले असून, अशा व्यवसायांना संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा …’ पंढरपुरात फडणवीसांचे विठुरायाकडे साकडं; शेतकरी, युवक आणि महाराष्ट्रासाठी केली ‘ही’ प्रार्थना

Saturday, 25 July 2026, 9:57

26 दिवस उपोषण केलं, जीव धोक्यात घातला; तरी सरकारसोबत डील केली म्हणता? सोनम वांगचुकांचा टीकाकारांना सवाल

Saturday, 25 July 2026, 9:28

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

Saturday, 25 July 2026, 9:10

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Saturday, 25 July 2026, 8:59

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Saturday, 25 July 2026, 8:47

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला मंजुरी! लवकरच सुरू होणार सेवा

Saturday, 25 July 2026, 8:32
Next Post

यवतमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता; एका प्रकरणात लोणी काळभोरच्या तरुणावर फूस लावून पळवून नेल्याचा संशय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.