Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरगुती गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरताना पोलिसांची धाड ! 2 जणांवर गुन्हा दाखल; बारामतीतील घटना

संदीप टूलेby संदीप टूले
Sunday, 24 March 2024, 18:30

बारामती,(पुणे) : बारामती तालुक्यातील मुर्टी येथे घरगुती सिलेंडरमधील गॅस हा व्यवसायिक सिलेंडरमध्ये भरताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी धाड टाकली आहे. यामध्ये 37 सिलेंडरसह तब्बल 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संकेत सुरेश जगदाळे आणि मयूर प्रकाश जगदाळे (दोघेही रा. मुर्टी, ता. बारामती जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत बारामतीचे पुरवठा निरीक्षक रवींद्र दशरथ पारधी यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 मार्च रोजी रात्री साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान संकेत जगदाळे याच्या मुर्टी येथील बंद असलेल्या कुक्कुटपालन केंद्रामध्ये घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संकेत जगदाळे यांचे मुर्टी येथे कुक्कुटपालन केंद्र आहे. रात्रीच्या सुमारास हे दोघेजण हयगयीने मानवी सुरक्षेची कोणतीही काळजी न करता घरगुती सिलेंडरमधील गॅस हा कमर्शियल सिलेंडरमध्ये भरत होते. त्यावेळी वडगाव निंबाळकर पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी धाड टाकत कारवाई केली.

 

या कारवाईत 1 लाख 21 हजार 500 रुपयांच्या किमतीचे प्रत्येकी साडेचार हजार रुपये किंमत असलेले तब्बल 27 सिलेंडर, तसेच हिंदुस्तान पॅट्रोलियम कंपनीचे 1 लाख 66 हजार 500 रुपये किमतीचे 37 व्यावसायिक सिलेंडर, तर 2 लाख 15 हजार रुपये किमतीचे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे घरगुती 86 सिलेंडर देखील जप्त करण्यात आले आहेत.

तसेच 3 लाख रुपयांचा अशोक लेलँड कंपनीचा फिक्कट पिवळ्या रंगाचा टेम्पो, वजन काटा, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्युमिनियमच्या नळ्या असा 8 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपास परीविक्षाधीन अधिकारी दर्शन दुगड करत आहेत.

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

‘परफेक्ट बॉडी’चं स्वप्न दाखवायचा अन् प्रतिबंधित इंजेक्शन्स विकायचा; पुण्यात जिम ट्रेनरचा काळा धंदा उघडकीस

Wednesday, 29 July 2026, 12:39

न्यायालयाच्या आदेशालाही सार्वजनिक बांधकाम विभागाचा ठेंगा! अभियंत्याच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य जप्त; …अखेर लोणी काळभोर, वडकी, कुंजीरवाडीच्या शेतकऱ्यांचा विजय

Wednesday, 29 July 2026, 12:33

पुण्यात भेसळखोरांना तुकाराम मुंढेंचा दणका! गणेश, भवानी आणि नाना पेठेत FDA चा मोठा छापा; विनापरवाना साठवलेल्या चॉकलेट्स-कँडीज जप्त

Wednesday, 29 July 2026, 12:12

‘मी लय मोठा होऊन दाखवीन’ सांगून गायब झालेला आर्यन गवारे सुखरूप सापडला; उरुळी कांचन पोलिसांच्या अन् पालकांच्या तत्परतेमुळे 24 तासांत लागला शोध

Wednesday, 29 July 2026, 11:51

नीट फेरपरीक्षेचा पेपरही ३ दिवस आधीच फुटला होता? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप; कागदपत्र दाखवत केला खुलासा

Wednesday, 29 July 2026, 11:30

67 वर्षांचा वृद्ध निघाला गांजा विक्रेता? दौंडमध्ये वृद्धाच्या घरातून सापडला गांजाचा मोठा साठा; एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 29 July 2026, 11:10
Next Post

उरुळी कांचन येथील तलाठ्याचा मुलगा बनला तहसीलदार ; रोहित शेळकंदेचे होतेय सर्वत्र कौतुक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.