Thursday, October 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत आणलं! शिरूरमध्ये डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव, CCTV व्हिडिओ व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 11:41

अक्षय टेमगिरे

शिरूर: शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाची अचानक प्रकृती  बिघडली. रुग्ण बेशुद्ध पडल्याने काही क्षणांसाठी हॉस्पिटलमध्ये धावपळ उडाली होती.

मात्र, प्रसंगाचे गांभीर्य ओळखत डॉ. अतुल सुराणा यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ CPR (Cardiopulmonary Resuscitation) सुरू केले. वेळेवर आणि योग्य पद्धतीने करण्यात आलेल्या CPR मुळे रुग्णाला पुन्हा श्वासोच्छ्वास मिळू लागला आणि त्याची प्रकृती स्थिर करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

प्राथमिक उपचारांनंतर पुढील विशेष उपचारांसाठी संबंधित रुग्णाला बारामती येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण हॉस्पिटलमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या व्हिडिओमध्ये डॉ. अतुल सुराणा यांनी दाखवलेली तत्परता, प्रसंगावधान आणि आपत्कालीन परिस्थितीत घेतलेला जलद निर्णय स्पष्टपणे दिसून येत असल्याने त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

पहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हृदयविकाराचा झटका किंवा अचानक हृदयक्रिया बंद पडल्यास पहिल्या काही मिनिटांत योग्य पद्धतीने दिलेले CPR रुग्णाचा जीव वाचविण्यास अत्यंत महत्त्वाचे ठरते. मांडवगण फराटा येथील ही घटना त्याचाच प्रत्यय देणारी ठरली आहे.

ग्रामीण भागातही आधुनिक वैद्यकीय सुविधा, प्रशिक्षित डॉक्टर आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने दिलेले उपचार यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असा विश्वास या घटनेमुळे अधिक दृढ झाला आहे.

डॉ. अतुल सुराणा यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, ही घटना इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कुंजीरवाडीतील पेट्रोल पंपावर झोपलेल्या ट्रकचालकांचे दोन महागडे मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला

Thursday, 29 October 2026, 15:41

लोणी स्टेशन चौकात धोकादायक पद्धतीने वाहन उभे; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 29 October 2026, 15:28

BMC कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! बोनस जाहीर; किती रुपये मिळणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

Thursday, 29 October 2026, 15:16

पुण्यातील विचित्र प्रकार! ‘दादा मला भूक लागलीय, खायला दे” म्हणत डायरेक्ट तरुणाचा खिशात हात घातला अन् विरोध करताच लोखंडी रॉडने हल्ला…

Thursday, 29 October 2026, 14:58

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचा धुरळा! 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समित्यांसाठी रणशिंग फुंकणार?

Thursday, 29 October 2026, 14:53

लंडनहून पुण्यात आली अन् घरात संशयास्पदरित्या आढळला मृतदेह! फोन बंद, बँक खात्यावरून पैसेही गायब; तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

Thursday, 29 October 2026, 14:53
Next Post

गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचं आमिष, 88 कोटींची फसवणूक; पुण्यात घोटाळा करून दुबईला पळालेल्या आरोपीला पोलिसांनी भारतात आणून ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp