Thursday, May 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Patas News : दारूसाठी पैसे न दिल्याने टेम्पोचालकासह मालकाला मारहाण; पाटसच्या डोंगरेश्वर चौकातील घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 28 May 2026, 14:01

यवत, (पुणे) : दारू पिण्यासाठी टेम्पो चालकाने पैसे न दिल्याने दोन दुचाकीस्वारांनी चालकाला व त्याच्या मालकाला लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. तसेच खिशातील 1500 रुपयांची रोकड बळजबरीने चोरून नेल्याचा प्रकार घडला. रविवारी (ता. 24) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पाटस (ता. दौंड) गावचे हद्दीत जुना दौंड रोडचे डोंगरेश्वर चौकात हि घटना घडली. याप्रकरणी दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब ज्ञानदेव गावडे (वय ४२, व्यवसाय- ड्रायव्हर, रा. बेटवाडी, ता. दौंड) असे मारहाण झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. तर सुनिल सुरेश पौळ, रा. डोंगरेश्वर दौंड) व अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही) असे मारहाण करून पैसे लुटणाऱ्या दोघांची नावे आहेत. याबाबत गावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन जुन्या दौंड रोडने पाटस गावच्या हद्दीतून चालले होते. ते डोंगरेश्वर चौकात आले असता, आरोपी सुनिल पौळ आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने आपली ‘स्प्लेंडर’ मोटरसायकल फिर्यादीच्या टेम्पोसमोर आडवी लावली. टेम्पो थांबताच दोघेही चालक भाऊसाहेब यांच्याजवळ आले आणि थेट “आम्हाला दारू पिण्यासाठी पैसे दे,” अशी मागणी करू लागले.

फिर्यादी ड्रायव्हरने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करत भाऊसाहेब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी फिर्यादीच्या शर्टच्या खिशात जबरदस्तीने हात घालून आतील 1500 रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेतली.

दरम्यान, टेम्पोचे मालक मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता, आरोपींनी त्यांना आणि ड्रायव्हर दोघांनाही रस्त्यावरील दगडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. शिवीगाळ करून आरोपी आपल्या मोटरसायकलवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्यानुसार यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार बंडगर करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महायुतीचा ’11-4-2′ फॉर्म्युला ठरला! विधान परिषद निवडणूकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

Thursday, 28 May 2026, 15:31

नीट परीक्षेच्या गोपनीयतेची जबाबदारी आता इंडियन आर्मीवर? पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Thursday, 28 May 2026, 15:13

लोणी काळभोरमध्ये बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून वारंवार बलात्कार

Thursday, 28 May 2026, 14:49

सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; आजचे दर जाणून घ्या

Thursday, 28 May 2026, 14:42

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

Thursday, 28 May 2026, 14:13

Patas News : दारूसाठी पैसे न दिल्याने टेम्पोचालकासह मालकाला मारहाण; पाटसच्या डोंगरेश्वर चौकातील घटना, दोन जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 28 May 2026, 14:01
Next Post

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ 'पुणे प्राईम न्यूज'च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.